शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:50 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-इतवारी दरम्यान छिंदवाडा आमान परवर्तन तथा इतवारी येथील मोठ्या लाईनच्या कामामुळे २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापर्यंत तसेच २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी ४ वाजतापर्यंत...

ठळक मुद्देकळमना-इतवारी दरम्यान छिंदवाडा आमान परवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-इतवारी दरम्यान छिंदवाडा आमान परवर्तन तथा इतवारी येथील मोठ्या लाईनच्या कामामुळे २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापर्यंत तसेच २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी ४ वाजतापर्यंत तब्बल ४४ तासांचा नानइंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द तर अनेक गंतव्य स्थानकाच्या आधीच समाप्त होतील. तर काही गाड्यांच्या मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे.यात नागपूर-रामटेक (५८८१०), रामटेक-इतवारी-रामटेक पॅसेंजर (५८८१४, ५८८०९, ५८८१२, ५८८१३,५८८११) या गाड्या २ व ३ फेब्रुवारी रोजी रद्द राहतील. रामटेक-इतवारी (५८८११) पॅसेंजर १ फेब्रुवारीला इतवारी स्थानकात समाप्त होईल. गोंदिया-इतवारी-गोंदिया (६८७१३, ६८७४३, ६८७१५) या गाड्या २ व ३ फेब्रुवारीला कामठी स्थानकात समाप्त होतील. तर (६८७१४, ६८७४४,६८७१६) या गाड्या २ व ३ फेब्रुवारीला इतवारीवरून न सुटता कामठीवरून प्रस्थान करतील.टाटा-इतवारी (५८१११) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला दुर्गमध्ये समाप्त होईल. तर इतवारी-टाटा (५८११२) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला इतवारी स्थानकातून न सुटता ३ व ४ फेब्रुवारीला दुर्गवरून वेळेवर प्रस्थान करेल. तिरोडी-इतवारी (५८८१६) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला तुमसर रोड स्थानकात समाप्त तर इतवारी-तिरोडी (५८८१५) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला इतवारीवरून न सुटता तुमसर रोडवरून प्रस्थान करेल.रायपूर-इतवारी (५८२०५) पॅसेंजर १, २ व ३ फेब्रुवारीला तुमसर रोड स्थानकात समाप्त होईल. तर इतवारी-रायपूर (५८२०६) पॅसेंजर २, ३ व ४ फेब्रुवारीला इतवारीवरून न सुटता तुमसर रोडवरून प्रस्थान करेल.बिलासपूर-नागपूर (१८२३९) बिलासपूर-नागपूर शिवनाथ एक्स्प्रेस २ व ३ फेब्रुवारीला नागपूरऐवजी गोंदियात समाप्त होईल. नागपूर-बिलासपूर (१२८५६) इंटरसिटी २ व ३ फेब्रुवारीला नागपूरऐवजी गोंदियावरून निर्धारित वेळेवर सुटेल. बिलासपूर-नागपूर ((१२८५५) इंटरसिटी १, २ व ३ फेब्रुवारीला गोंदियात समाप्त होईल. नागपूर-बिलासपूर (१८२४०) शिवनाथ एक्स्प्रेस १, २ व ३ फेब्रुवारीला नागपूरऐवजी गोंदियावरून २, ३ व ४ फेब्रुवारीला निर्धारित वेळेवर सुटेल.शालीमार एक्स्प्रेस (१८०३०/१८०२९) व महाराष्टÑ एक्स्प्रेस (११०४०/११०३९) २ व ३ फेब्रुवारीला इतवारीऐवजी नागपूर-कलमना सरळ मार्गाने धावेल म्हणजे इतवारीवरून जाणार नाही.