शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात प्रकरण भोवणार

By admin | Updated: October 5, 2016 01:17 IST

तिरोडा तालुका कृषी विभागाने आय.डब्ल्यू.एम.पी.-२ अंतर्गत २४ गावांमध्ये मूत्रीघर बांधण्याचे उपक्रम

मंडळ कृषी अधिकाऱ्याचा प्रताप : तक्रारीवरून तिरोडा पोलिसांची चौकशीकाचेवानी : तिरोडा तालुका कृषी विभागाने आय.डब्ल्यू.एम.पी.-२ अंतर्गत २४ गावांमध्ये मूत्रीघर बांधण्याचे उपक्रम राबविण्याकरिता निविदा जाहिरात वृत्तपत्रात दिली. त्या वृत्तपत्राचे जनसामान्यांत अस्तित्व नसून राज्य शासनाच्या शासकीय जाहिरात सूचित नाव नाही. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात या साप्ताहिक वृत्रपत्राची माहितीच उपलब्ध नसल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुळे तिरोडा कृषी विभाग चांगल्याच कचाट्यात सापडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.तालुका कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाने तिरोडा तालुक्यातून प्रकाशित हिंदी साप्ताहिक तिरोडा एक्सप्रेसमध्ये २० मे २०१४ च्या अंकात शेवटच्या पृष्ठावर निविदा (सूचना क्र.४/२०१४-१५/दिनांक १८/५/२०१४) जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ही जाहिरात कदाचित शहरातील लोकांनीही वाचली की नाही, यावर शंकाच व्यक्त करण्यात आली. निविदेच्या जाहिरातीनुसार तिरोडा / आय.डब्ल्यू.एम.पी.२ मधील २४ गावांत २.९० लांबी, १.९५ मीटर रुंदीचे बांधकाम करण्याकरिता निविदा मागविण्यात आली होती. एक मूत्रीघर बांधकामाची रक्कम २५ हजार असून अंदाजे निविदा रक्कम सहा लाख रूपये होती. नोंदणीकृत कंत्राटदार वर्ग ३ ते ६ कडून निविदा मागवायच्या होत्या. शेवटची तारीख ३० मे २०१४ देण्यात आली होती. २ जून २०१४ ला निविदा उघडायच्या होत्या. अटी व शर्तीनुसार काम करणे बंधनकारक होते. परंतु तिरोडा कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या स्वार्थाकरिता ही निविदा अधिक कंत्राटदारांना माहीत होवू नये, याकरिता सार्वजनिक ठिकाणी दिसू नये किंवा कोणी वाचू शकत नाही, अशा तिरोडा एक्सप्रेस या हिंदी साप्ताहिकमध्ये जाहीर कण्यात आली. मात्र कार्यालयातील फाईलला जोडून ठेवण्याकरिता आणि आपल्या जवळच्या कंत्राटदाराला काम देवून अधिक आर्थिक लाभ घेता येईल, याकरिता कृषी विभागाने असे केले आहे. मूत्रीघर बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या होत्या. परंतु कारवाई करण्यात आली नाही. आजही अनेक गावातील मूत्रीघर नाकाम किंवा जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.(वार्ताहर)