शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

हाजरा फॉल येथे आता ‘अ‍ॅडवेंचर स्पोर्टस्’

By admin | Updated: January 3, 2015 23:04 IST

निसर्गाचे वरदान म्हणून जिल्ह्यातच काय, लगतच्या राज्यांत ओळख असलेल्या हाजरा फॉल येथे आता पर्यटकांसाठी पर्यटनाशिवाय एक विशेष भेट वनविभागाकडून दिली जाणार आहे.

वन विभागाचा पुढाकारकपिल केकत - गोंदियानिसर्गाचे वरदान म्हणून जिल्ह्यातच काय, लगतच्या राज्यांत ओळख असलेल्या हाजरा फॉल येथे आता पर्यटकांसाठी पर्यटनाशिवाय एक विशेष भेट वनविभागाकडून दिली जाणार आहे. वन विभागाने मांडलेल्या एडवेंचर स्पोर्टस्च्या (साहसी खेळ) प्रस्तावाला जिल्हा पर्यटन समितीने मंजूरी दिली असून हाजरा फॉल येथे येत्या दोन-तीन महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अंदाज वन विभागाकडून वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकांच्या विकासासाठी, त्यांच्याच माध्यमातून हा प्रयोग राबविला जाणार असून यासाठी नवाटोला येथील १० जणांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. आजघडीला जिल्हावासीयांना सुटीचा अवघा दिवस घालविण्यासाठी पाहिजे तसे पर्यटन स्थळ नाही. सालेकसा तालुकास्थळापासून सुमारे आठ कि.मी. अंतरावरावरील कोसमतर्रा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले हाजरा फॉल हे पर्यटन स्थळ वनविभागाच्या अखत्यारित येते. हाजरा फॉल जरी पर्यटकांना आकर्षीत करीत असले तरी काही तासांच्या विरंगुळा केल्यानंतर दिवस घालविण्यासाठी दुसरे असे काहीच नाही. शिवाय हाजरा फॉलचे विशेष आकर्षण पावसाळ््यापुरते मर्यादीत न राहता वर्षभर पर्यटकांची आवाजावी रहावी यासाठी नवे काही करण्याच्या विचारात वन विभाग होता. यातूनच हाजरा फॉल येथे एडवेंचर स्पोर्टस सुरू करण्याची संकल्पना वन विभागाचे उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांना सुचली व त्यांनी एडवेंचर स्पोर्टस्चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत असलेल्या जिल्हा पर्यटन समितीकडे मांडला. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमित सैनी यांनाही आवडला व त्यांनी लगेच मंजूरी दिली. नॅशनल एडवेंचर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वन विभाग हा नावीन्यपूर्ण प्रयोग येथे करणार आहेत. यांतर्गत स्थानिक लोकांच्या सहभागातून पर्यटनस्थळाचा विकास व सोबतच त्या लोकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जवळील ग्राम नवाटोलावासीयांची वन व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली असून नवाटोलावासीयांचे सहकार्य लाभत आहे. सर्व कारभार वन व्यवस्थापन समितीकडे हाजरा फॉलकडे वन विभागाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळाचा विकास होऊ शकला नाही. विशेष म्हणजे वन विभाग याकडे सातत्याने लक्ष देऊ शकत नसल्याने स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच याचा विकास साधण्यासाठी वन विभाग प्रयत्नरत आहे. यामुळे इको-डेव्हलपमेंट अंतर्गत नवाटोला येथे वन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्या मार्फत सध्या या स्थळाची स्वच्छता, व्यवस्थापन व अनैतिक प्रकारांवर आळा घालण्याचे कार्य केले जात आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या ५ आॅक्टोबर २०११ च्या परित्रकानुसार वन व्यवस्थापन समितीला पर्यटकांकडून शुल्क आकारण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. पुढेही हाजरा फॉलच्या माध्यमातून येणारे उत्पन्न वन व्यवस्थापन समितीकडेच राहणार असून त्यातूनच समितीला या स्थळाचा विकास व देखरेख व अन्य खर्च वहन करायचे आहेत. तसेच येथील लोकांच्या हाताला यातूनच काम उपलब्ध होणार आहेत.