शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचा लाभ

By admin | Updated: August 22, 2016 00:13 IST

यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

नाना पटोले यांची माहिती : खासदार, आमदारांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना दिला दिलासासाकोली : यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. किन्ही मोखे येथे लष्करी अळीच्या प्रकोपाने नुकसान झालेल्या पिकांची पाणी करताना खासदार नाना पटोले यांनी ही माहिती यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली.लष्करी अळी, गादमाशी रोगापासून पिकांना नुकसान झाले असेल त्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहायक यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या नावे साधा अर्ज करून त्यात पिकविम्याचे नंबर टाकायचे आहे. अर्ज प्राप्त होताच कृषी सहायक त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे व त्या आधारावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. किन्ही येथील शेतकऱ्यांच्या पिकांना अडींचा प्रादुर्भाव दिसून आला. खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांनी शेतबांधावर भेट दिली. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी किरवे, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी पर्यवेक्षक चंदन मेश्राम, कृषी पर्यवेक्षक राधेश्याम खोब्रागडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी खासदार पटोले यांनी परिसरातील शेतीची पाहणी केली व त्यावर कृषी विभागाने तात्काळ उपाय करण्याच्या सुचना दिल्या. तालुक्यात लष्करी अळीचा प्रादूर्भाव असून शेत पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पुन्हा नव्या संकटामुळे अडचणीत आणले आहे. (तालुका प्रतिनिधी)