शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवाडा ८ जूनपर्यत

By admin | Updated: June 1, 2017 01:10 IST

उन्नत शेती समृध्द शेतकरी पंधरवाडा जिल्हयात २५ मे ते ८ जून २०१७ या रोहीणी नक्षत्राच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : उन्नत शेती समृध्द शेतकरी पंधरवाडा जिल्हयात २५ मे ते ८ जून २०१७ या रोहीणी नक्षत्राच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या उद्दीष्टपूर्तीसाठी चालू वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहीम राबविण्यात येणार आहे. २५ मे ते ८ जून २०१७ पर्यंत पंधरवाडा साजरा करावयचा आहे. कृषि सहाय्यकाच्या कार्य क्षेत्रातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचे नियोजन केले आहे. या पंधरवाडयातील कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात वार्ता फलक लावून कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचिवणे प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी सरासरी उत्पादकता व अनुवांशिक उत्पादन क्षमता यातील तफावत दूर करणे, शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाच्या रक्कमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेवून नैसिर्गक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळवून देणे, प्रमुख पिकांच्या उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने नविन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच पीक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे, आणी प्रति थेंब अधिक उत्पादन या संकल्पनाबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणे, एकात्मिक शेती पध्दती, बहुवार पीक पध्दती, आंतर पिक पध्दतीबाबत जनजागृती करणे, कृषित संलग्न व कृषी पूरक व्यवसाय जसे पशूपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्यशेती, रेशीम उद्योग, आळींबी लागवड इत्यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निव्वळ व आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता मार्गदर्शन करणे, उत्पादन वाढीकरीता नविण्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे.