शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी दत्तक-पालक योजना

By admin | Updated: July 22, 2016 02:36 IST

आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यात सरकारी यंत्रणेला फारसे यश आलेले नाही.

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सामाजिक संस्थांची घेणार मदत नरेश रहिले गोंदिया आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यात सरकारी यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे कुपोषणमुक्तीसाठी आता जिल्हा प्रशासनाने नवीन फंडा आणला आहे. यात कुपोषित बालकांना सामाजिक संस्थांनी, नागरिकांनी दत्तक घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. त्यानुुसार गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेत दत्तक-पालक योजनेला मंजुरी दिली आहे. यात अदानी फाऊंडेशनने ४५ गावे दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे. गोंदिया जिल्ह्यात ८८ हजार ३९३ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४ हजार ८२४ बालके कमी वजनाची, ९४६ तीव्र कमी वजनाची तर ७३ बालके अतितीव्र कमी वजनाची आढळली आहेत. कुपोषणाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन, तसेच सन २००४-१५ पासून माता आरोग्य व पोषण मिशन सुरू करण्यात आले. मात्र कुपोषणाला आळा घालण्यात पाहीजे त्या प्रमाणात यश आले नाही. या मिशनअंतर्गत १४ जून २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दत्तक पालक योजना सुुरू करण्याची सूचना दिली. त्या आधारावर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या अभियानाला मंजुरी दिली आहे. दत्तक पालक योजनेसोबत व्हीसीडीसीच्या माध्यमातून हे कुपोषणमुक्त अभियान राबविले जाणार आहे. ही योजना अंमलात आणण्यासाठी सर्व पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुक्यातील नियंत्रण पथक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पत्र पाठविण्यात आले. आरोग्य व बालकल्याण विभागासह शासकीय, अशासकीय संस्था, जेष्ठ नागरिक हे कुपोषणाच्या श्रेणीतील सॅम-मॅम बालकांना दत्तक घेतील.