शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पीक बदल करुन शेतीपूरक व्यवसायाची कास धरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या ...

बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या लहरीपणावर शेती अवलंबून आहे. यातच वेळी-अवेळी निसर्गाचा कोप बरसतो. खतांच्या वाढत्या किंमती, उत्पादीत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगाची कमतरता या बाबी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती होण्यास आड येत असल्याने शेतकऱ्यांनी पीक बदल करुन प्रक्रिया उद्योगाबरोबरच शेतीपुरक व्यवसायाची कास धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्यावतीने घेण्यात आलेल्या कृषी विभागातील विविध योजनेबाबत शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भिमाशंकर पाटील, प्रा.ढोके, नागभिडे, तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष रतीराम राणे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार उपस्थित होते. सुसंवाद कार्यक़्रमात तालुका सल्लागार समितीचे शेतकरी तसेच तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांच्याशी चर्चा करुन बोंडगावदेवी येथे बांबु समुह, गोठणगाव येथे मका, केशोरी येथे मिरची, इटखेडा येथे मत्स्यपालन समुह तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. आमदारांनी सुचविलेल्या समुहाला कार्यान्वीत करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा विभाग कटिबध्द असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. निवड झालेल्या समुहातील शेतकऱ्यांच्या प्राथमिक सभा घेऊन माहिती संकलन करणे, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजीत करणे, पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करुन निवडलेले समूह पूर्णत्वास नेण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी मानले.