शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अनाथ मुलाच्या उपचारासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: July 2, 2015 01:44 IST

तिरोडा येथील जगजीवन वार्डातील भूखबळी ठरलेल्या ललिता शिवकुमार रंगारी यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी राज्यशासनाने जबाबदारी स्वीकारली.

आरोग्य विभागाचा पुढाकार : बुधवारी हलविले केटीएसमध्येगोंदिया : तिरोडा येथील जगजीवन वार्डातील भूखबळी ठरलेल्या ललिता शिवकुमार रंगारी यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी राज्यशासनाने जबाबदारी स्वीकारली. आता आरोग्य प्रशासनाने त्यांच्या संपूर्ण चाचण्या व औषधोपचारासाठी पुढाकार घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुलाला बुधवार (दि.१) दुपारी १२ वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम व उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांच्या उपस्थितीत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ क्रमांकाच्या इमर्जंसी मेडीकल सर्व्हिस या अ‍ॅम्बुलंसने हलविण्यात आले. बुद्धघोष शिवकुमार रंगारी (१८) असे त्या मुलाचे नाव असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी त्याचे संपूर्ण चाचण्या करवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले. तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रांची सोय नसल्यामुळेच सदर निर्णय घेण्यात आला. बुद्धघोषच्या डोळ्यांमध्ये काहीतरी फरक आहे. मात्र परिसरातील नागरिकांकडून जन्मापासूनच त्याचे डोळे तसे असल्याचे सांगण्यात आले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात बुद्धघोषच्या डोळ्यांची फंडोस्कोपी व रेटिनोस्कोपी करण्यात येणार आहे. याशिवाय आयक्यू टेस्ट (इंटिलिजंट कोशंट), सिटी स्कॅन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी त्याच्या मामानेसुद्धा नाकारल्याने आता शासनालाच योग्य पाऊल उचलने भाग आहे. ‘स्पीच थेरपी’ देणारतिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुद्धघोषला आंघोळ घालून त्याला जेवू घालण्यात आले व नंतर तेथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. येथे संपूूर्ण औषधोपचारानंतर समाजकल्याण विभागाच्या वतीने त्याला मतिमंद शाळेत घालण्यात येणार आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याच्या आईची बिडी पेंशन मिळाली नसल्याने ती काढण्यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. बुद्धघोषला स्पीच थेरपीची गरज असल्याने केटीएस रूग्णालयात आणण्यात आले. त्याच्या उपचारानंतर त्याला आश्रमशाळेत दाखल करण्यात येणार आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी सांगितले आहे.