शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीला सामोरे जाण्यास प्रशासन सज्ज

By admin | Updated: June 26, 2015 01:33 IST

गोंदिया जिल्हा परिषद व तिरोडा पंचायत समितीच्या संचालक पदांसाठी येत्या ३० जून रोजी मतदान होणार आहे.

तिरोडा तालुका : १ लाख १४ हजार ५०५ मतदारकाचेवानी : गोंदिया जिल्हा परिषद व तिरोडा पंचायत समितीच्या संचालक पदांसाठी येत्या ३० जून रोजी मतदान होणार आहे. यात जि.प. साठी सात तर पं.स. करिता १४ उमेदवार निवडून येणार आहेत. तिरोडा तालुक्यात निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज असून तालुक्यातील एक लाख १४ हजार ५०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरूष मतदार ५७ हजार ७१५ तर स्त्री मतदार ५६ हजार ७९० असून एकूण मतदान केंद्रे १५० आहेत.तिरोडा तालुक्यात जि.प. क्षेत्राच्या सात आणि पं.स. च्या १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. जि.प. च्या सात गटांसाठी गट क्रमांक ३० ते ३६ व पं.स. करिता ५९ ते ७२ गण तयार करण्यात आले आहेत. जि.प. अर्जुनी क्षेत्रात एकूण मतदार १५ हजार ८१९ असून यात पुरूष मतदार सात हजार ७७३ व महिला मतदार आठ हजार ४६ आहेत. सेजगाव क्षेत्रात एकूण मतदार १७ हजार १०८ असून पुरूष आठ हजार ४७३ तर महिला आठ हजार ६३५, सुकडी-डाकराम क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार २३९ असून पुरूष सात हजार ९२३ व महिला आठ हजार ३१६, ठाणेगाव क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार ९४१ असून पुरूष आठ हजार ५४५ व महिला आठ हजार ३९६, कवलेवाडा क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार ७८० असून पुरूष आठ हजार ३५० व महिला आठ हजार ४३०, सरांडी क्षेत्रात एकूण मतदार १५ हजार ४९८ असून पुरूष सात हजार ७३९ व महिला सात हजार ७५९ आणि वडेगाव जि.प. क्षेत्रात एकूण मतदार १६ हजार १२० पैकी पुरूष मतदार सात हजार ९८७ व महिला मतदार आठ हजार १३३ आहेत.तिरोडा पं.स.च्या १४ संचालकांच्या निवडणुकीसाठी जि.प. क्षेत्राच्या मतदारांना मतदान द्यायचे आहे. अर्जुनी गटाच्या परसवाडा पं.स. क्षेत्रात एकूण मतदार सात हजार ८३० असून पुरूष मतदार तीन हजार ८३६ तर महिला मतदार तीन हजार ९९४ व अर्जुनी पं.स. क्षेत्रात सात हजार ९८९ एकूण मतदारांपैकी पुरूष तीन हजार ९३७ व महिला चार हजार ५२ आहेत. सेजगाव गटातील सेजगाव पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार आठ हजार ४७७ असून पुरूष चार हजार २१८ व महिला चार हजार २५९, चिरेखनी पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार ६३१ असून पुरूष चार हजार २५५ व महिला चार हजार ३७६ आहेत. सुकडी-डाकराम गटाच्या इंदोर खु. पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार ५५७ असून पुरूष चार हजार १६८ व महिला चार हजार ३६९ आहेत. ठाणेगाव जि.प. क्षेत्रातील चिखली पं.स. क्षेत्रात एकूण मतदार आठ हजार २२२ असून पुरूष चार हजार १९१ व महिला चार हजार ३१ आहेत.कवलेवाडा जि.प. क्षेत्रातील कवलेवाडा पं.स. गणात एकूण मतदार आठ हजार १७९ असून पुरूष चार हजार ७५ व महिला चार हजार १०४ आहेत. सरांडी गटाच्या सरांडी गणात एकूण मतदार सात हजार ५४९ असून पुरूष तीन हजार ७७६ व महिला तीन हजार ७७३, केसलवाडा गणात एकूण मतदार सात हजार ९४९ असून पुरूष तीन हजार ९३३ व महिला तीन हजार ९८६, सुकडी डाकराम पं.स. गणात एकूण मतदार सात हजार ६८२ असून पुरूष तीन हजार ७५५ व महिला तीन हजार ९२७, ठाणेगाव गणात एकूण मतदार आठ हजार ७१९ असून पुरूष चार हजार ३५४ व महिला चार हजार ३६५, मुंडीकोटा गणात एकूण मतदार आठ हजार ६०१ असून पुरूष चार हजार २७५ व महिला चार हजार ३२६, वडेगाव गटांतर्गत येणाऱ्या वडेगाव गणात एकूण मतदार आठ हजार ६३९ असून पुरूष चार हजार ३०७ व महिला चार हजार ३२, कोयलारी गणात एकूण मतदार सात हजार ४८१ असून पुरूष मतदार तीन हजार ६८० तर महिला मतदार तीन हजार ८०१ आहेत. तिरोडा तालुक्यातील १५० मतदान केंद्रांसाठी ६०० व इतर शंभराच्या वर असे एकूण ६०० ते ६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कामावर लावले आहे. (प्रतिनिधी)