शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधीचे समायोजन करणे भोवले

By admin | Updated: March 2, 2016 02:16 IST

शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या नावे जमा झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या मंजुरीविनाच ...

ग्राहक मंचचा निर्णय : नुकसान भरपाईसह रक्कम देण्याचे आदेशगोंदिया : शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या नावे जमा झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या मंजुरीविनाच त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या रकमेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने समायोजित केली. मात्र कायद्याने त्यांच्या मंजुरीविना सदर रक्कम समायोजित करता येत नसल्याचा निर्णय देत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने सदर बँकेला चांगलाच झटका दिला.नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया येथील रहिवासी नवानंद दादू भौतिक हे रेलटोली येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत खातेदार सभासद होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना अनुज्ञेय असलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन लाख नऊ हजार रूपये शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर बँकेत त्यांच्या खात्यात वर्ग केली. मात्र तक्रारदाराने बँकेतून घेतलेल्या थकीत कर्जाच्या रकमेत भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर समायोजन केले. त्यामुळे तक्रारदार नवानंद भौतिक यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. या प्रकारासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जबाबदार असून तक्रारदार भौतिक यांच्या कुटुंबीयांनाही मोठीच आर्थिक तंगी सहन करावी लागली.भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर समायोजन करता येत नाही, याकरिता त्यांनी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांनी दाखल केलेले पुरावे व युक्तिवाद ऐकण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, भविष्य निर्वाह निधीची रक्कम खातेदाराच्या परवानगीशिवाय कर्जाच्या रकमेत परस्पर समायोजित करता येत नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तक्रारदार भौतिक यांना तक्रार रक्कम दोन लाख नऊ हजार रूपये तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून नऊ टक्के व्याजाने परत करावी. तसेच मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रूपये द्यावे, असा आदेश पारित केला.सदर आदेश जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी पारित केले.(प्रतिनिधी)