शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत पुरेपूर प्रमाणात लसींचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST

गोंदिया : अवघ्या देशातच कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत चालला आहे. त्यात राज्यातील स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त गंभीर ...

गोंदिया : अवघ्या देशातच कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत चालला आहे. त्यात राज्यातील स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त गंभीर असून, यातूनच आता केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे आता ४५ वर्षांवरील व्यक्ती ज्यांना काही व्याधी नाही तेसुद्धा कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

जिल्ह्यातील स्थिती बघता ४० वर्षांवरील नागरिकांची संख्या ४,४८,३७५ एवढी आहे. ४५ वर्षांपासून नागरिकांची मोजणी केल्यास यातील काही नागरिक कमी होतील. मात्र तरीही एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. शिवाय आता ४५ वर्षांवरील प्रत्येकच नागरिकाचे लसीकरण करावे लागणार असल्याने लसींची मागणीही वाढणार आहे. आतापर्यंत पुरेपूर प्रमाणात लसींचा साठा मिळत आला असल्याने लसीकरणात अडचण निर्माण झाली नाही. मात्र आता लसींची मागणी वाढणार असून त्यात पुरवठा कमी झाल्यास मात्र लसीकरणात अडचण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

------------------------------

- जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले - १६ जानेवारी

- आरोग्यसेवक (२३ मार्चपर्यंत)

पहिला डोस - ८,६८४

दुसरा डोस - ४,३५४

- फ्रंटलाइन वर्कर्स

पहिला डोस - ११,७८३

दुसरा डोस - ३,५३६

ज्येष्ठ नागरिक -

पहिला डोस - २३,५८३

- ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले

पहिला डोस - ९,३६४

--------------------------------

सुमारे ४ लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण

शासन परवानगीनुसार आता ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस द्यायची आहे. अशात जिल्ह्यातील ४० वर्षांवरील नागरिकांची संख्या ४,४८,३७५ एवढी होत आहे. यातील ४०-४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कमी केल्यानंतरही ती संख्या सुमारे ४ लाखांच्या घरात जाईल. म्हणजेच, आरोग्य विभागापुढे आता एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान आहे.

---------------------------------

मागणीच्या तुलनेत पुरेपूर पुरवठा

जिल्ह्याला आतापर्यंत ८९,४२० डोस मिळाले आहेत व त्यामुळे लसीकरण सुरू आहे. यात मंगळवारपर्यंत जिल्ह्यात १९,०५० डोसचाच साठा होता. मात्र त्याच दिवशी आणखी ९,२५० डोस मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यात आता लसींचा साठा शिल्लक आहे. आतापर्यंत जिल्ह्याला मागणीनुसार डोस मिळाले आहेत.

-----------------------------

जिल्ह्यात आता ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करावयाचे आहे. यामुळे आता लसींची मागणी वाढणार आहे. आतापर्यंत मागणीनुसार पुरवठा झाल्याने लसीकरणात अडचण निर्माण झाली नाही. मात्र आता मागणी वाढणार व त्यानुसार पुरवठा अपेक्षित आहे. यासाठी केंद्रेही वाढविली जाणार आहेत.

- डॉ. नितीन कापसे,

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.