शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

देवरी येथे पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. १०५ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टमधून ८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत २२४ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : ८००६ स्वॅब नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन दिवसांपासून देवरी येथील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि.२८) आढळलेल्या एकूण चार कोरोना बाधितांमध्ये दोन देवरी येथील तर एक अर्जुनी मोरगाव आणि एक गोंदिया तालुक्यातील आहे.चार नवीन कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा २६० वर पोहचला आहे. एक कोरोना बाधित कोरोनामुक्त झाला.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत २२४ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात २७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी आढळलेल्या चार कोरोना बाधित रुग्णांमध्ये देवरी येथे दोन, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध भिवखिडकी येथील एक आणि गोंदियाजवळील फुलचुर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून देवरी येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने येथील एकूण बांधितांचा आकडा १४ वर पोहचला आहे. देवरी येथे कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. परिणामी देवरीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. १०५ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टमधून ८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.१२४४ जण क्वारंटाईनविविध संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात १८४ आणि होम क्वारंटाईन १०६० असे एकूण १२४४ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने १५६ चमू आणि ५४ सुपरवायझरची ३२ कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे.कंटेन्मेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.जिल्ह्यात आता ३२ कंटेन्मेंट झोनकोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गोंदिया तालुक्यात मुंडीपार, फत्तेपूर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर व सिव्हिल लाईन, सालेकसा तालुक्यातील पाथरी, पाउलदौना, शारदानगर, रामाटोला, देवरी तालुकयातील देवरी येथील वॉर्ड क्र मांक ८, वॉर्ड क्र मांक ९ आणि वॉर्ड क्र मांक १६, आखरीटोला व गरवारटोली, सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवनी व पाटेकुरा, गोरेगाव तालुक्यातील भडंगा, डव्वा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा सुभाष वॉर्ड, वीर वामनराव चौक, भूतनाथ वार्ड, न्यू सुभाष वॉर्ड, किल्ला वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गराडा, बेरडीपार, बेलाटी खुर्द आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या