शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली असून, बाधितांची वाढती संख्या बघता जिल्ह्यात आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविण्यात ...

गोंदिया : जिल्ह्यातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली असून, बाधितांची वाढती संख्या बघता जिल्ह्यात आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यात ३४ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वाढविण्यात आलेल्या ११ मध्ये आठ कंटेन्मेंट झोन सडक-अर्जुनी येथील आहेत.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या रविवारी ७४५वर गेली आहे. यामुळे क्रियाशील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून, त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यापासून इतरांना धोका उद‌्भवू नये, यासाठी आता कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यात एकूण २० कंटेन्मेंट झोन होते. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यात आता वाढ करून शनिवारी (दि. १०) आणखी तीन कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले होते.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याचे सत्र सुरूच असल्याने रविवारी आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आता जिल्ह्यात एकूण ३४ कंटेन्मेंट झोन झाले आहेत, तर वाढविण्यात आलेल्या ११ कंटेन्मेंट झोनमध्ये १ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम जान्हवा, १ गोंदिया शहरातील मनोहरभाई वॉर्ड कालीबाडी, तर १ फुलचूरपेठ येथील असून, उर्वरित ८ सडक-अर्जुनी येथील आहेत.

----

सडक-अर्जुनीत कोरोनाचा कहर

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम माहुली येथे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, तेथे ३२ बाधित आहेत. तसेच कोहळीटोला येथेही कंटेन्मेंट झोन असून, तेथे २० बाधित आहेत. अशात आता सडक-अर्जुनीत आणखी आठ कंटेन्मेंट झोन तयार करावे लागले आहेत. यात वॉर्ड क्रमांक १, २, ३, ६, ७, ८, १६, १७ यांचा समावेश आहे. येथे ३२ कोरोनाबाधित आहेत.

-----

आता झाले एकूण ३४ कंटेन्मेंट झोन

शुक्रवारच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २० कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक आठ कंटेन्मेंट झोन गोंदिया शहरातील होते. मात्र, कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असून, बाधितांमध्ये दिवसेंदिवस भर घालत असल्याने आता कंटेन्मेंट झोनमध्येही वाढ करावी लागत आहे. यामुळेच शनिवारी तीन कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले, तर रविवारी ११ कंटेन्मेंट झोनची भर पडली आहे.