शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामाचे पैसे जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:36 IST

आजूबाजूच्या अनेक गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. काही खेड्यांत पाट (लहान कालवा), मुंडा जलाशय, बोडी तलाव आणि रस्त्यांची कामे करणे सुरु आहेत.

ठळक मुद्देमजुरांची मागणी : चकरा मारुनही वेळेवर पैसे मिळत नाही

ऑनलाईन लोकमतबाराभाटी : आजूबाजूच्या अनेक गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. काही खेड्यांत पाट (लहान कालवा), मुंडा जलाशय, बोडी तलाव आणि रस्त्यांची कामे करणे सुरु आहेत. पण कामावर गेलेल्या मजुरांची मजूरी लवकर जमाच होत नाही. म्हणून कामाचे पैसे तत्काळ जमा करण्याचीे मागणी मजुरांकडून केली जात आहे.तालुक्यात सुमारे ८० टक्के गावांत रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली. काम बरोबर होतात की नाही, याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष नाही, असे मजूर सांगतात. काही गावात १८ वर्षाखालील मजूर कामावर घेतले जातात. तर काही गावांमध्ये वयाचे ६० पूर्ण झालेले सुद्धा मजूर असतात. हा प्रकार ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या मनरेगाच्या कामावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक गावातील मजूर हे कामावर दांडी मारत असले तरिही हजेरी लावली जाते. कष्टाळू मजूर हे काम खूप मेहनतीने करत असतात पण मेहनतीप्रमाणे मजूरी मिळत नाही.आठवडाभर काम करुन सुद्धा मजुरांचे पैसे बरोबर जमा होत नाही. परिणामी मजुरांना विनाकारण चकरा माराव्या लागत असल्याने मजूर त्रस्त झाले आहे.प्रस्थापित शासन हे सर्वसामान्य हिताचे काम करत नाही. मजुरांना, सामान्य माणसांना विनाकारण त्रास देतात, अनेक वेळा मजुरांना सिंगल व संयुक्त खाते उघडण्यास सांगतात. पण काम मात्र संबंधीत विभाग व बँकेकडून होत नाही. आधार लिंक, भ्रमणध्वनी लिंक असे नानाविध कारणे सांगून मजुरांना त्रास दिला जात आहे. दिवसभर काबाळकष्ट करून घामाचे पैसे मिळत नसल्याने मजुरांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे.लोकप्रतिनिधीनी यासर्व प्रकाराची नोंद घेवून मजुरांचे थकीत मजुरी मिळवून द्यावी. अशी मागणी अशी मागणी येरंडी, बोळदे, कवठा, सुकळी, बाराभाटी, कुंभीटोला, डोंगरगाव, ब्राम्हणटोला, सूरगाव, देवलगाव येथे कामे सुरु असलेल्या गावांतील मजुरांची आहे.