शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकालाचे तीव्र पडसाद

By admin | Updated: January 11, 2017 01:54 IST

गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गोंदियात विविध ठिकाणी उमटले.

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गोंदियात विविध ठिकाणी उमटले. सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या विजयी मिरवणुकीवर पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाली. त्यातच नंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आल्याने मंगळवारीही तणावसदृश परिस्थिती होती. दुसऱ्या एका मिरवणुकीदरम्यान रामनगरातील एका विजयी मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला. तर तिसऱ्या घटनेत भाजपाच्या पराभूत उमेदवाराच्या पतीकडून भाजपच्याच पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. पोलीस सूत्रानुसार, प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय रगडे यांनी नागरिकांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी रात्री गौतम नगराच्या मदिना मस्जिदच्या मागील रस्त्याने विजयी मिरवणूक काढली. यादरम्यान त्यांच्या मिरवणुकीवर काँग्रेसच्या पराभूत उमेदवारासह काही लोकांनी दगडफेक केल्याने त्या २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रगडे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केल्यामुळे त्यांच्या ६६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दगडफेकीत नगरसेवक विजय रगडे, त्यांचे भाऊ रंजीत गणेश रगडे (४२) रा.सावराटोली व इतर कार्यकर्ते जखमी झाले. रगडे यांनी काँग्रेसचे उमेदवार अफजल हुसैन शाह ऊर्फ छन्नुभाई यांचा पराभव केल्यामुळे या पराभवाचे शल्य पचवू न शकलेल्या छन्नुभाई व त्यांच्या कार्यकत्यांनी त्यांच्या विजयी रॅलीवर विटा, दगड, भांडी फेकून मारहाण केली. इतकेच नव्हे तर तलवारीही काढण्यात आल्या. रगडे यांना जातीवाचक शिवीगाळही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर गोंदिया शहरात तणाव निर्माण झाला होता. मिरवणूक रॅलीवर हल्ला करणाऱ्या आरोपी अफजल छन्नू शाह, आसिफ कानखो, संदीप जेबकट, सलीम कुरैशी, शब्बीर पठान, शब्बीर पठानचा मुलगा, शब्बीर पठानची पत्नी, अफजल शाहचा मोठा मुलगा, आरिफ कुरैशी, रफिक तोत्या व इतर १० इसम अश्या २० जणांवर गोंदिया शहर पोलिसांनी रंजीत गणेश रगडे (४२) यांच्या तक्रारीवरुन भादंविच्या कलम १४१, १४७, १४९, २९४, ३२४, ३४१, सहलकम ३, १, आर.एस.३,२, व्ही.ए. अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७, १, ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(तालुका प्रतिनिधी) रामनगरातही मिरवणुकीत तणाव रामनगर येथील जुन्या विद्युत पॉवर हाऊस जवळून विजय मिरवणूक जात असताना अश्विन हनुवंतराव नायडू (३२) याचा खांदा कृणाल पारधी याला लागला. यावरून झालेल्या वादात नऊ जणांवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अश्विन नायडू यांना आरोपी कृणाल पारधी, राजू पारधी, अशोक पारधी, चिनू पारधी, सुमीश पारधी व इतर चार अशा नऊ जणांनी बेदम मारहाण केली. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी सदर आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक रगडेंवर गुन्हा दाखल नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झाल्यानंतर विजय गणपत रगडे या नगरसेवकाने ८० ते १०० कार्यकर्त्यांना घेऊन विजयी रॅली काढली. परवानगी न घेताच रॅली काढल्यामुळे गोंदिया शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ६६ लोकांवर गुन्हा दाखल विजय रगडे यांच्या विजयी मिरवणुकीवर दगडफेक केल्यानंतर रगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यासमोर येऊन घोषणाबाजी करीत आक्रोश व्यक्त केला. रस्ता अडवून ठेवून पोलिसांच्या कामात अडथडा निर्माण केला. रात्री ९ वाजतापर्यंत हा रस्ता अडून होता. या संदर्भात पोलिस हवालदार हालीकचंद चौधरी यांच्या तक्रारीवरुन मोहीत रगडे, सहस होलीकर, अंकुश मेश्राम, हरिष टेंभेकर, अमीत बोरकर, संतोष जांभुळकर व इतर ६० महिला-पुरुषांनी रस्ता अडवून ठेवल्यामुळे त्यांच्यावर भादंविच्या कलम १४३, १५१, १५३, अ, ३४१, १८६ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या २० लोकांवर गुन्हा दाखल प्रभाग क्रमांक १८ येथून निवडणूक जिंकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय रगडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली, असा आरोप करणारे काँग्रेसचे पराभूत उमेदवार अफजल छन्नू शाह यांनी मुस्लीमांना भडकावून धर्म आणि जातीच्या नावावर तेढ निर्माण केला, अशी तक्रार निवडणूक बंदोबस्तासाठी गोरेगाव पो.ठाण्यातून आलेले सहायक पो.निरीक्षक मनिष बन्सोड यांनी शहर पोलिसात केली. त्यावरून अफजल छन्नू शाह याच्यासह इतर २० जणांवर भादंविच्या कलम १४३, १५१, १५३, अ, ३४१, १८६ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.