शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत हाणामारी, एकाच्या खुनाचा प्रयत्न

By admin | Updated: May 9, 2017 00:54 IST

मामा चौकातील इजाज यांची मोटार सायकल जळाल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली.

२३ जणांवर गुन्हा : मोटार सायकल जळाल्यावरून झाला वादलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मामा चौकातील इजाज यांची मोटार सायकल जळाल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. परिणामी दोन गटातील २३ जणांवर गैरकायद्याची मंडळी तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्यामुळे ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.शहराच्या मनोहर चौकातील धीरज तुळशीराम विश्वकर्मा (२२) यांना सोमवारच्या रात्री १२.३० वाजता ११ जणांनी मोटार सायकल जाळल्याचा संशय घेऊन चाकूने मारहाण केली. ते स्टेशनवर जात असताना आरोपी इजाज, जफर, राजा, तौसीफ, सोहेल, फैजल, साहील, तौसीफ लंबू व इतर तीन अशा ११ जणांनी त्यांना रस्त्यात अडवून थापड बुक्यांनी मारहाण केली. तर जफरने चाकूने मारुन खूनाचा प्रयत्न केला. सदर ११ आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४७,१४९, ३४१, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या गटातील १२ आरोपींनी अब्दुल सफूर गफूर (७२) रा. डोंगरतलाव छोटा गोंदिया यांच्या घरावर हल्ला करुन दोन वृद्धांना बेदम मारहाण केली. त्यांच्या घरातील विद्युत मीटर, कुलर व सायकलची तोडफोड केली. या प्रकरणात अब्दुल सकूर गफूर (७२) व मकबूल बी अब्दूल सकूर गफूर (९०) हे दोन वृद्ध गंभीर जखमी झाले. रविवारच्या रात्री ११.४० वाजता आरोपी पप्पू टेंभरे, गणेश साखरपुडे, कमल हरिणखेडे, प्रविण हरिणखेडे, चिंटू साठवणे, सोनू, दीप वासनिक, धनीराम बिसेन, बबलू तुरकर, प्रमोद शेंडे, छोटू मेश्राम व अन्य एक या १२ जणांनी बांबू व काठ्या घेऊन त्यांच्या घरी तोडफोड केली. या संदर्भात सदर आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४६, १४९, ४५२, ३२३, ४२७, ४४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात गणेश काशिराम साखरपुडे (२३) रा. शास्त्री चौक गोंदिया, प्रविण तिमाजी हरिणखेडे (२४) रा. माता मंदिर छोटा गोंदिया, धनिराम देहाराम बिसेन (२५) रा. विठ्ठल रूख्मिणी मंदिरजवळ छोटा गोंदिया व कमल तिमाजी हरिणखेडे रा. माता मंदिरजवळ छोटा गोंदिया यांचा समावेश आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला करीत आहेत.