शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:12 IST

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून देवरीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी शहरातील पानठेले व डिस्पोजल बॅग विक्रेते अशा विविध दुकानात धाड टाकून खर्रा पन्नी, डिस्पोजल बॅग, कॅरीबॅग अशा विविध प्रकारचे साहित्य चार दुकानातून जप्त केले.

ठळक मुद्दे२० हजार रुपयांचा दंड वसूल : व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून देवरीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी शहरातील पानठेले व डिस्पोजल बॅग विक्रेते अशा विविध दुकानात धाड टाकून खर्रा पन्नी, डिस्पोजल बॅग, कॅरीबॅग अशा विविध प्रकारचे साहित्य चार दुकानातून जप्त केले. तसेच २० हजार रुपयाचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. देवरी शहरात पुढील काळात राबविण्यात येत असलेल्या प्लास्टीक बंदीचा संदेश आपल्या या कारवाईतून दिला. या कारवाईमुळे शहरातील इतर प्लास्टिक साहित्य विकणाºया दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. शासनाने प्लास्टिक व थर्माकोल विक्रीवर बंदी लागू केली आहे. मात्र यानंतरही काही विक्रेते प्लास्टिकची सर्रासपणे विक्री करीत आहे. दरम्यान मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी अवैध प्लास्टिक विक्रेत्यांवर तपासणी मोहीम राबवून कारवाई केली. ही कारवाई नगर पंचायतचे पाणी पुरवठा अभियंता सचिन मेश्राम, कर्मचारी कैलास सोनवाने, वामन फुन्ने, अरुण धारगाये यांनी केले.पथनाट्यातून जनजागृतीदेवरी शहरात प्लास्टिक बंदी व केरकचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. याबाबत नागरिकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगर पंचायत देवरीच्या वतीने संपूर्ण शहरात पंधरा दिवस स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. देवरी शहरात शंभर टक्के कचरा विलगीकरण करण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला. या वेळी नगराध्यक्ष कौशल कुंभरे, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, नियोजन सभापती व बांधकाम सभापती नेमीचंद आंबीलकर, महिला व बाल कल्याण सभापती सीता रंगारी, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, नगरसेवक प्रवीण दहीकर, संतोष तिवारी, यादोराव पंचमवार, नगरसेविका भूमिता बागडे, कांता भेलावे, माया निर्वाण उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी