शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

पहिल्याच दिवशी शंभर वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:53 IST

जिल्ह्यात सोमवार (दि.२२) पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यापूर्वी वाहन चालकांना १० दिवसाची मुभा देण्यात आली होती. मात्र यानंतरही हेल्मेट खरेदी न करता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : वाहतूक विभागाची मोहीम, वाहन चालकात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सोमवार (दि.२२) पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यापूर्वी वाहन चालकांना १० दिवसाची मुभा देण्यात आली होती. मात्र यानंतरही हेल्मेट खरेदी न करता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली.हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना ५०० रूपये दंड करण्यात आला. मोहीमेच्या पहिल्याच दिवशी १०० लोकांकडून ५०० प्रमाणे ५० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान वाहतूक नियंत्रण विभागाच्या धडक कारवाईमुळे वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात दरवर्षी १५० व्यक्ती रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात.रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्ती अवकाळी मृत्यू पावतात. वाहन चालक प्राणास मुकू नये, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे १५ पोलिसांना यापूर्वी दंड केला होता.सामान्य नागरिक वाहन चालवितांना हेल्मेट वापरावेत म्हणून त्यांच्यासाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली. वाहन चालवितांना हेल्मेट न वापरलेल्या १२५ ते १५० लोकांना हेल्मेट घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. पोलिसांच्या सल्ल्यावरुन त्या वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांच्या समोरच हेल्मेट खरेदी केले.अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, वडील, आई यांच्यावर आर्थिक, शारीरीक व मानसिक संकट उदभवते. दरवर्षी रस्ता अपघातात सामान्य जनतेसह गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मृत्यू पावतात. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त दुचाकी चालक असतात. त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर संकट कोसळते.या सर्व प्रकारच्या परिस्थीतीवर लक्ष वेधून हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.ज्यांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केलेला नाही, अश्या लोकांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सवय लागावी यासंदर्भात सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया शहरात राबविलेल्या मोहीमेत १०० वाहन चालकांना मोटार वाहन काद्यान्वये प्रत्येक व्यक्तीवर ५०० रूपये प्रमाणे ५० हजार रूपये तडजोड शुल्क त्यांच्याकडून वसूलकरण्यात आले.एकावर गुन्हा दाखलहेल्मेट सक्तीचे झाल्याने वाहतूक पोलीस वाहन चालकांना हेल्मेट न वापरल्यास दंड करण्यासाठी थांबवित असताना फुलचूर येथील टी पार्इंटवर सोमवारी (दि.२२) दुपारी १ वाजता वाहन क्र. एमएच ३५ ए.एस. ८२५४ चा चालक दुर्योधन दयाराम भोयर (३४) व दुशासन दयाराम भोयर (२८) रा. कनेरी ता. सडक-अर्जुनी हे दोन्ही भावंडांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. पोलिसांना मारण्यास धावल्याने त्या दोघांविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलिसात भादंविच्या कलम ३५३, ३५४, ५०४, ५०९, २९४ सहकलम १३०, १२९, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.मोटारसायकल चालकांनी व मागे बसणाऱ्या व्यक्तींनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेट वापरावेत. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.-संजय सिंह, सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.