शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना गांभिर्याने घेऊन मारहाण करणाºयांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या ...

ठळक मुद्देमहावितरणचा पुढाकार : वीज चोरीच्या आरोपींना अटक, कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना गांभिर्याने घेऊन मारहाण करणाºयांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरण कर्मचारी उन्ह, वारा व पावसात ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचाºयांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो, ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते, अशांसाठी भादंविच्या कलम ३५३ कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.वीज कर्मचाºयांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा मोफत वापरण्यासाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत आहेत. त्यामुळे महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करणे अशक्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाºयांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे, हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांनी काम तरी कसे करावे, असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहे. उद्दिष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे, हे प्रकार अलीकडच्या काळात जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र वाढले आहेत. संबंधितांविरूद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.शिक्षा व दंडाची तरतूदवीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºयांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यं कैद आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षांपर्यत कैद आणि दंडाची तरतूद असून कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकीत हल्ल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.