लोकमतचा दणका : तंटामुक्त गावात अवैध दारू सुरू असल्याचे वृत्त गोंदिया : जिल्हा पोलिसांनी अवैध दारुचा विरोधात मोहीम चालवून जिल्ह्यातील अवैध दारु विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात दारु व साहित्य जप्त केले आहेत. या संदर्भात गुरूवारी तंटामुक्त गावात अवैध दारू सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरवाणी येथील चुन्नीलाल रामनी मडावी (५०) याच्या घरुन ९ लिटर मोहफुलाची दारु जप्त केली. साखरीटोला येथून एका मोटारसायकलवर ४८ नग देशी दारुचे पव्वे वाहून नेणाऱ्या संतोष चमारु फुंडे (४२) रा. बाम्हणी व राजकुमार श्यामलाल हुकरे (३२) रा. आमगाव या दोघांना अटक करण्यात आली. २७ हजार ४०० रुपयाचा माल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महालगाव येथील शिवदास ओंमकार जतपेले (४८) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोहळीटोला आदर्श येथील निकेश गुलाब फुल्लूके (२५) याच्याकडून तीन नग देशी दारुचे पव्वे, डव्वा येथील शशिकांत उर्फ सचिन भिमराव बडोले (३७) याच्याकडून तीन नग देशी दारुचे पव्वे, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत घासलीटोला/मुल्ला येथील श्रीराम आसाराम घासले (५७) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे, शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या श्रीनगर येथील अभिषेक छगन बंसोड (३६) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, भीमनगरातील सुशील उर्फ पेडा प्रभूदास कडवे (३७) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, शारदा वाचनालयाजवळून दारु वाहून नेणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. एका मोटरसायकलवर ४ पेटी दारु पव्वे घेऊन जात असताना रविंद्रन थंगम (३१) रा. वार्ड क्रमांक ३ आमगाव याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून एक मोटारसायकल व दारु असा ५९ हजार ६०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोहका येथील सपना भाऊराव दमाहे (४५) या महिलेकडून ५४० मिली दारु, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथील अशोक केवळराम कोरचे (५१) याच्याकडून ४ नग देशी दारु, महागाव येथील सुधाकर अभिमन्यू हुकरे (३८) याच्याकडून २ नग देशी दारुचे बॉटल, तिरोडा पोलिसांनी भुराटोला येथील विलास छन्नालाल जांभूळकर (५०) याच्याकडून २० लिटर हातभट्टीची दारु, गोरठा येथील सुंदर रामदास नायडू (५८) याच्याकडून ९ लिटर हातभट्टीची दारु, ठाणा येथील दिलीप जगन्नाथ डहाटकर (५०) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, सालेकसा तालुक्याच्या कोटजंभुरा येथील रमेश संपत टेकाम (४७) याच्याजवळून ८ नग देशी दारुचे पव्वे बाबाटोली आमगाव खुर्द येथून जप्त केले. रामनगरच्या दिनदयाल वार्डातील संजय जगन्नाथ बोरकर (४२) याच्याकडून पाच नग देशी दारुचे पव्वे गोंदिया ग्रामीण पोलिसांनी मोरवाही येथील अनिता नेवारे (३५) हिच्याकडून चार लिटर मोहफुलाची दारु, ढिमरटोली येथील रोशन शेंडे (२८) याच्याकडून १३ नग देशी दारुचे पव्वे, नागरा येथील योगराज लिल्हारे याच्याकडून ७ लिटर मोहफुलाची दारु, देवरी तालुक्याच्या पुतळी येथील लक्ष्मी महादेव गुरमवार (४५) याच्याकडून १५ देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)महिलांना तंमुसचे पाठबळगावागावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी अवैध दारू विक्री संदर्भात सुरूवातीला कबर कसली होती. त्यानंतर आता परवाना प्राप्त दारू दुकाने किंवा बिअरबारची दुकाने राहू नये यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.महिलांच्या आंदोलनाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पाठबळ आहे. काही गावातील ग्राम पंचायतचे पदाधिकारी चिरीमिरी घेण्यासाठी दारू विक्रेत्यांना सहकार्य करतात. तर कही गावातील ग्राम पंचायतचे पदाधिकारी विरोध दर्शवित आहेत.
अवैध दारुविक्रेत्यांवर धडक कारवाई
By admin | Updated: April 24, 2017 00:32 IST