शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

१९० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:03 IST

मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहूतक नियंत्रण शाखेने

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह : दीड वर्षातील कारवाई गोंदिया : मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहूतक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली असून मागी दीड वर्षात १९० मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. परिणामी प्राणांतिक अपघाताच्या ११ घटनांमध्ये घट झाली आहे. मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांनाही धोका पोहचविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे धाडसत्र वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी चालविले आहे. मद्याच्या धुंदीत वाहन चालविणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडसत्र चालविल्यामुळे मद्यपी वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईची धास्ती घेत अनेकांनी मद्यप्रशान करून वाहन चालविण्याचे टाळणे सुरू केले आहे. सन २०१५ या वर्षात दारू पिणाऱ्या १०३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक गुन्हे गोंदिया शहरात दाखल करण्यात आले. सन २०१६ च्या जानेवारी महिन्यात १४ गुन्हे, मार्च महिन्यात सात, एप्रिल महिन्यात १०, मे महिन्यात २०, जून महिन्यात २१ व जुलै महिन्यात आतापर्यंत १५ असे ८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्यात १४३ प्राणांतिक अपघात घडले होते. परंतु ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह संदर्भात कारवाई करण्यात आल्याने सन २०१५ मध्ये १३२ प्राणांतिक अपघात घडले असून ११ गुन्ह्यांची घट आहे. भरधाव वेगात त्यातही मद्याच्या धुंदीत वाहन चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. (तालुका प्रतिनिधी)