शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलेचा खून करणाऱ्या आरोपींना अटक

By admin | Updated: July 1, 2014 01:33 IST

काटी ते बघोेलीदरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ एका २५ वर्षीय गरोदर महिलेचा गळा आवळून खून होण्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्या महिलेला झाडावर गळफास लावलेल्या

दोन बायकांचा मामला : पती व सवतीच्या वडिलांचे कृत्यरावणवाडी : काटी ते बघोेलीदरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ एका २५ वर्षीय गरोदर महिलेचा गळा आवळून खून होण्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्या महिलेला झाडावर गळफास लावलेल्या अवस्थेत लटकविण्यात आले होते. त्यावेळी त्या मृत महिलेची ओळखही पटली नव्हती. अखेर या हत्येचा उलगडा करण्यात रावणवाडी पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना १४ जूनच्या रात्रीदरम्यान घडली होती. रावणवाडी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवून या हत्याकांडातील दोन आरोपींना रविवारी (दि.२९) बालाघाट जिल्ह्याच्या रामपायली येथून अटक केली. रविशंकर चचाणे (३०) रा. बालाघाट व आसाराम तांगशे (६५) रा. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर याला दोन पत्नी होत्या. पहिली पत्नी आसाराम तांगशे याची मुलगी होती. दुसरी पत्नी रोशनी ही आठ ते नऊ महिन्यांची गर्भवती होती. रोशनीला संपविण्यासाठी तिचा पती रविशंकर व पहिल्या पत्नीचे वडील आसाराम तांगशे या दोघांनी कट रचला होता. या दोघांनी कट रचून रोशनीच्या गळ्याला केबलने आवळून तिचा खून केला. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने व आत्महत्या सिद्ध करण्यासाठी तिचा मृतदेह एका वृक्षावर टांगण्यात आला. ही घटनेचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले. तपास कार्य व आरोपींना पकडण्यासाठी रावणवाडी पोलिसांनी चार-चार शिपायांच्या पाच चमू तयार केल्या होत्या. तपासादरम्यान त्या महिलेचा पतीच रोशनीचा खुनी असल्याचे पोलिसांना कळले. यानंतर आरोपींच्या शोधात रावणवाडी पोलीस बालाघाट जिल्ह्यातील रामपायली येथे गेले. तेथून पोलिसांनी आरोपी रविशंकर चचाणे व आरोपी आसाराम तांगशे या दोघांना अटक केली. आरोपींना पकडण्यासाठी रावणवाडीचे पोलीस निरीक्षक निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक शेळके, पोलीस हवालदार रहांगडाले, पोलीस हवालदार येळे, देशपांडे यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)