शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा : युवराज तरोणे यांची मागणी अर्जुनी मोरगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे तालुक्यात करारनामे होऊनही ...

रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा : युवराज तरोणे यांची मागणी

अर्जुनी मोरगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे तालुक्यात करारनामे होऊनही अद्याप कामांना सुरुवात झालेली नाही. पावसाळा तोंडावर आहे. रस्ते खोदकाम झाल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण करावे. अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी सावरटोलाचे सरपंच युवराज तरोणे यांनी केली आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्य महामार्ग क्रमांक ११ वर खोली बोंडे मार्ग किमत २६०.८५ लक्ष, चापटी ते सावरटोला- बोरटोला मार्ग किंमत १५६.७१ लक्ष, पुष्पनगर अ ते पुष्पनगर ब किंमत १४५.२९ लक्ष, तुकुम सायगाव ते कन्हाळगाव १५६.१० लक्ष ही चार कामे मंजूर आहेत. कंत्राटदारांशी करारनामे करण्यात आले. करारनामे होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही काही कामांना तर अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही. चापटी- सावरटोला या मार्गावर कंत्राटदारांनी जिकडेतिकडे खड्डे पाडून रस्त्यांची दुर्दशा केली आहे. यावर्षी लवकर येणारा पावसाळा लक्षात घेता सदर कंत्राटदाराच्या चुकीमुळे हे रस्ते होणार नाहीत असे चित्र आहे. एवढा मोठा निधी मंजूर असूनही परिसरातील शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना या रस्त्यात झालेल्या खोदकामाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे यंत्रणेने वेळीच कंत्राटदाराकडून कामे करून घ्यावीत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी. जेणेकरून शासनाच्या निधीचा योग्य वापर होऊन जनतेला न्याय मिळेल, अशी मागणी सावरटोल्याचे सरपंच युवराज तरोणे यांनी केली आहे. आता याकडे जिल्हा प्रशासन किती लक्ष देते व सदर कंत्राटदारांवर कारवाई करून काम कशी पूर्ण होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.