शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भेसळखोरांना अभय; फक्त १४ नमुने घेतले

By admin | Updated: October 29, 2016 01:10 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात भेसळखोरी होत आहे.

नाममात्र कारवाई : भेसळखोरांशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे?गोंदिया : दिवाळीच्या मुहूर्तावर गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात भेसळखोरी होत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याचा केवळ देखावा करीत फक्त १४ ठिकाणचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. त्या नमुन्यांचा अहवाल काही महिन्यांनी येईपर्यंत सर्व भेसळयुक्त मिठाई व इतर पदार्थ गोंदियावासीयांकडून फस्त केले जाणार आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळखोरी होत आहे. मिठाई, तेल व खोवा यात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. परंतु अन्न प्रशासन विभागाने महिनाभरात फक्त पाच कारवाई केल्या आहेत. त्या कारवाया मोठ्या व्यापाऱ्यांवर होणे अपेक्षित होते. परंतु मोठ्या माश्यांना सोडून छोटया माश्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणातून १४ नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठिवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परंतु दिवाळीत विक्री होत असलेल्या साहित्याच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल दिवाळीनंतर येणार असल्याने त्यानंतर अधिकारी त्या अहवालानुसार कारवाई करणार की नाही ही शंकाच आहे. घेतलेल्या नमुन्यांपैकी काही नमुन्यात भेसळ आढळली असेल तर त्या दुकानातील साहित्य तर मोठ्या प्रमाणात बिनधास्त विक्रीला जात आहेत. तो व्यापारी भेसळयुक्त साहित्यातून आपली कमाई करणार आहे. त्यातून मिळालेल्या मिळकतीतून अधिकाऱ्यांना त्यांचा वाटा देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल दिवाळीनंतर येणार असल्याने भेसळखोरांना अभय आहे. (तालुका प्रतिनिधी)छोट्या व्यापाऱ्यांवर पाच कारवाया अर्जुनी-मोरगावच्या महागाव येथील प्रेमबंद पमनदास साधवानी यांच्या दुकानातून ३० हजार १२५ रूपयाची तंबाखू जप्त केली. ही कारवाई १८ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. गोंदियाच्या नगर परिषद समोरील मे. गुरूनानक चिरोजी भंडार मधून ८८.४ किलो तेल किंमत ५ हजार ७४६ रूपयाचा माल, महागाव येथील साई किराणा स्टोर्स मधून ४०३.४०० किलोचे तेल किंमत २८ हजार २३८ रूपयाचा माल प्ति करण्यात आला. जय बाबा टेडर्स माताटोली गोंदिया व मे. शिव आॅईल मील मधून अनुक्रमे ३३ हजार ९६६ व २३ हजार २०० रूपयाचा माल जपत करण्यात आला आहे.