सौर उर्जा पंप ठरले वरदान : वन्यप्राण्यांची गावाकडील धाव टळली ेसडक अर्जुनी : उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते. यंदा मात्र वन्यप्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून त्यांची गावाकडील धाव टळली आहे. कारण नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात वन विभागाने सौर उर्जा पंप लावले असून त्यामुळे जंगलात मुबलक पाणी झाले आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात नवेगावबांध, डोंगरगाव/डेपो व बोंडे या तीन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याच वनपरिक्षेत्रात खोबा-१, घोडादेव, रांझीचा टोक या ठिकाणीही सौर ऊर्जा पंप प्रस्तावित आहेत. डोंगरगाव (डेपो) वनपरिक्षेत्रात क्र.नं. ५७४ मध्ये कृत्रिम पाणवठा आहे. तर सौर ऊर्जेवर चालणारे चार पंप बसविले आहेत. त्यात शेरपार-१, डोंगरगाव, कन्हाळगाव, खडकी या ठिकाणी तयार केले आहेत. नवीन प्रस्तावित म्हणून घाटकुही येथे तयार होणार आहे. तर पिंडकेपार, भसबोळण, मोठाघाट, लालझरी, कोटजांभोरा येथे प्रस्तावीत आहेत. बोंडे व डोंगरगाव/डेपो हे वनपरिक्षेत्र १२२.७६ चौरस किलोमिटरमध्ये विस्तीर्ण आहे. तर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान १२९.५५ चौरस किलोमीटरमध्ये आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेच्या माध्यमातून जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांचा खोलीकरणाचे काम होणार आहे. या खोलीकरणामुळे जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांना भरपूर पाणी उपलब्ध होईल. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात तिन्ही वनपरिक्षेत्रात १५ सौर ऊर्जा पंप बसविल्याने पाण्याची सोय झाली आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जंगलात प्राण्यांना पाण्याची समस्या सुटली आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे पंप २४ तास पाणी बाहेर टाकत असतात. जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. त्या पाणवठ्यात भरपूर पाणी राहत असल्यामुळे प्राणी इतरत्र भटकताना दिसत नाही. पाणवठे हे बशीच्या आकाराचे असल्यामुळे प्राणी पाण्यात पडल्याची भिती मुळीच नाही. जंगलातील वाघ, बिबट, हरीण, नीलगाय, रानडुक्कर, रोही, ससे, सांबर आदी सरपटणारे प्राणी या पाणवठ्यांचा उपयोग घेतात. नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पास बहुतेक ठिकाणी लहान मोठे तलाव आहेत. त्या तलावात पाणी आजही भरले आहे. कोसबी सहवनक्षेत्रात येत असलेल्या झनकारगोंदी तलावात भरपूर पाणी असल्याने प्राणी त्याच परिसरात राहणे जास्त पसंद करतात. जंगलातील गावांचे पुनर्वसन केल्यामुळे प्राण्यांना फिरण्यासाठी भरपूर जागा मिळाली आहे. सौर ऊर्जा बसविण्यासाठी ३ लाख ५० हजारांचा निधी खर्च होत आहे. शासनाची हि योजना वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्पात मुबलक पाणी
By admin | Updated: April 9, 2017 00:10 IST