शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अबब... अनेक विद्यार्थ्यांचे दोन शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

भाग : २ संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : एकाच नावाचे विद्यार्थी दोन वेगवेगळ्या शाळांत शिक्षण घेणे शक्य आहे का? ...

भाग : २

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : एकाच नावाचे विद्यार्थी दोन वेगवेगळ्या शाळांत शिक्षण घेणे शक्य आहे का? एकच विद्यार्थी एकाच शाळेत दोन भिन्न वर्गात व हाच विद्यार्थी आणखी दुसऱ्या शाळेत शिक्षण घेऊ शकतो काय? होय, हा चमत्कार केवळ सावित्रीबाई शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळेत घडत आहे. अर्जुनी मोरगाव नजीकच्या प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा प्रविष्ठ आहेत. पंचायत समितीच्या अगदी आवारभिंतीला लागून असलेल्या या शाळेत बिनबोभाटपणे हा प्रकार सुरू आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा हा प्रकार आहे.

शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथील सहा विद्यार्थी सावित्रीबाई शिशु मंदिर प्राथमिक शाळेतही प्रविष्ठ आहे. दोन्ही शाळांत या विद्यार्थ्याच्या स्टुडंट आयडी भिन्न-भिन्न आहेत. काही विद्यार्थी दोन्ही शाळात एकाच वर्गात तर काही विद्यार्थी एका शाळेत दुसरीत व दुसऱ्या शाळेत तिसरीत शिकत आहेत. एक विद्यार्थिनी मोरगाव येथे दुसरीत शिकत आहे. परंतु शिशु मंदिरात इयत्ता दुसरी व तिसरी अशा दोन्ही वर्गात प्रविष्ठ आहे. या विद्यार्थिनीचा तीनदा प्रवेश दाखविला आहे. शिशु मंदिर शाळेत एका विद्यार्थ्याचे नाव तिसरीत दोनदा प्रविष्ठ आहे. नावात अंशतः बदल करण्यात आला आहे. स्टुडंट आयडीला आधारकार्डचा क्रमांक जोडणी केल्यानंतरच त्या विद्यार्थ्यांची आयडी तयार होते. मात्र नाव, वडिलांचे नाव, आडनाव तसेच जन्मतारखेत खाडाखोड करून एकाच विद्यार्थ्याच्या अनेक आयडी तयार करण्यात आल्या. याआधारे प्रवेश केले खरे मात्र प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याचे खरे दस्तावेज शाळेच्या रेकॉर्डला असतील याची मुळीच शाश्वती नाही. विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र, आधारकार्ड आवश्यक असतात. पालकांच्या संमतीशिवाय प्रवेश होऊच शकत नाही. मात्र या शाळेत पालकांची परवानगी न घेता अनेक प्रवेश निश्चित झाले आहे. अर्जुनी नजीकच्या दाभना, मोरगाव, अर्जुनी, तावशी, निमगाव, सिग्नलटोली,बरडटोली, ताडगाव, राजीवनगर व इतर गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांचा या शाळेत प्रवेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.......

चौकशी केल्यास घबाड उघडकीस

चौकशी समिती नेमल्यास मोठे रॅकेट उजेडात येऊ शकते. या शाळेची पटसंख्या १८८ आहे. पोर्टलवर असलेल्या यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना समक्ष शाळेत बोलविल्यास किती विद्यार्थी प्रत्यक्ष हजर होतात यावरून बिंग फुटू शकते. या शाळेत हा प्रकार नेमका किती वर्षांपासून सुरू आहे, याची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती नेमल्यास यात लिप्त असलेले अधिकारी, कर्मचारी व इतर बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकार शिक्षण विभागाच्या लक्षात का येत नाही हे एक कोडेच आहे. यात काही अधिकारी, कर्मचारी गुंतले असण्याची शक्यता आहे.

.........

अंगणवाडी केंद्र पुरवठादार

या शाळेत अर्जुनी मोरगाव नजीकच्या गावातील विद्यार्थी दाखल आहेत.पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश केला नसतानाही प्रवेश कसा होऊ शकतो याचा मागोवा घेतला असता अंगणवाडी केंद्र हे दस्तावेज पुरविणारे केंद्र असल्याचे कळले. अंगणवाडी केंद्रात बालकांचे आधारकार्ड,जन्मतारीख व इतर माहिती असते. ते केंद्रातून प्राप्त करायचे व आपल्या शाळेत विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करायचे असा फंडा वापरला जात असल्याचे बोलल्या जाते.