शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरतीची हत्या नसून आत्महत्या!

By admin | Updated: August 29, 2015 01:48 IST

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीचा जळालेला मृतदेह गेल्या १७ आॅगस्ट रोजी तिच्या घरासमोरील विहीरीत आढळल्याने ....

सोनारटोला गूढ मृत्यूप्रकरण : एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराला अटकगोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीचा जळालेला मृतदेह गेल्या १७ आॅगस्ट रोजी तिच्या घरासमोरील विहीरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घरात एकटी असताना तिला मध्यरात्रीच्या सुमारास तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने तिला जाळून विहिरीत ढकलल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात होता. मात्र पोलिसांनी १० दिवसानंतर ती आत्महत्या असल्याचे निश्चित करून तिच्या प्रियकराला अटक केली.आरतीच्या आत्महत्येसाठी गावातील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असलेला योगराज ऊर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) हाच कारणीभूत असल्याचा ठपका अखेर पोलिसांनी ठेवून त्याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहा महिन्यापूर्वी आरतीला योगराजने प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. परंतू तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. नेहमी तिच्या मागे-मागे जाऊन तिला तो त्रास द्यायचा. या प्रकरणाची तक्रार तिने आई वडीलांकडे केली. आईवडीलांनी या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तंटामुक्त समितीतून समझोता केला होता. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर योगराजने मी आता यानंतर आरतीला त्रास देणार नाही असे लिहूनही दिले होते. दरम्यान, आरतीचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर तिची आत्महत्या नाही तर तिची योगराज व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हत्या केली, असा घरच्यांचा आरोप होता. पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु प्रकरण चिघळल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. या प्रकरणात आरतीने तंटामुक्त अध्यक्ष योगराज ऊर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) याच्या जाचाला कंटाळून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून टाकून घेतले व त्रास असह्य झाल्यामुळे घरासमोरील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी बांधला. २७ नोव्हेंबर २०१४ ते १७ आॅगस्ट २०१५ दरम्यान तिचा छळ त्याने केल्यामुळे त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे आता स्टँम्प पेपर आला कुठून?योगराज ऊर्फ मुन्ना चकोले हा आरतीवर एकतर्फी प्रेम करीत होता. ती त्याच्या प्रेमाला नकार देत होती त्यामुळे तो तिचा छळ करीत होता. सहा महिन्यांपूर्वी सालेकसा पोलिसांच्या साक्षीने समझोता करण्यात आला. या समझोत्यात शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर मुन्नाने आरतीला त्रास देणार नाही असे लिहून दिले होते. तो मुद्रांक पोलीस नायक विनायक बेदरकर यांच्याकडे होता. परंतु या प्रकरणानंतर बेदरकरने घुमजाव करून तो स्टॅम्प मुलीच्या नातेवाईकाकडे आहे, असे सांगितले होते. परंतु तो स्टॅम्प आता पोलिसांकडे आलाच कसा असा प्रश्न नातेवाईक करीत आहेत. आरोपीला सहकार्य करणाऱ्या बेदरकरला निलंबित करण्याची मागणी होत आहे. - तर दाखल होईल खुनाचा गुन्हाप्रकरण शांत करण्यासाठी सालेकसा पोलिसांनी स्टॅम्प पेपरचा आधार घेत आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यूचे कारण नमूद न करता व्हिसेरा रिपोर्टवर अहवाल अवलंबून ठेवल्यामुळे व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर तिचा जळून मृत्यू जर झाला असेल तर या प्रकरणात खुनाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.