शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आमगाव नगरी समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:28 IST

येथील नगर परिषदेचे वार्ड अनेक समस्यांचे माहेर घर झाले आहे. प्रभागात खड्डेमय रस्ते व घाणीने तुडूंब भरलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचे दुर्लक्ष : वार्डात घाणीचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील नगर परिषदेचे वार्ड अनेक समस्यांचे माहेर घर झाले आहे. प्रभागात खड्डेमय रस्ते व घाणीने तुडूंब भरलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आमगाव नगर परिषदेला प्रशासक आहे. येथील तहसीलदार राठोड निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने वार्डातील समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. राठोड यांना अतिरिक्त कार्यभार न.प.चा देण्यात आला. पण वार्डातील सोई-सुविधेच्या कार्याचे नियोजन व जबाबदारी पार पडत नसल्यामुळे नागरिकांत प्रशासनाविरुद्ध रोष आहे.विविध वार्डातील नाल्या, गटारे, कचरा पेट्या तुडूंब भरुन आहेत. इतरत्र वार्डात घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम घडून येत आहे. सदर वार्डातील रस्ते खड्डेमय झाल्याने प्रवाशांना व नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावरील विद्युत रोषणाई बंद पडल्याने प्रभागात रात्रीच्या वेळी काळोख पसरल्याचे दिसून येते. तसेच मुख्य मार्गावर मोकाट जनावरांमुळे व्यापारी व ग्राहकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते.वाहतूक व्यवस्थेचे तीनतेराआमगाव पोलीस ठाण्यांतर्गत मुख्य मार्गावरील आंबेडकर चौक, गांधी चौक, कामठा चौक या ठिकाणी दिवसेंदिवस रहदारी वाढतच चाललेली आहे. पण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. काही दिवस पांढरी खाकीने कर्तव्य बजावले. पण सध्या वर्दितील शुभ्र रंग दिसून येत नाही. १९ आॅक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहतुकीचे नियोजन केले नसल्याने व पोलीस कर्मचारी गांधी चौकात कर्तव्यावर नसल्याने बराच वेळ वाहतूक व्यवस्था चिघडलेली दिसून आली होती. पोलीस निरीक्षकांनी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून होत आहे.राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोधनगर परिषदेच्या निवडणुकीकरिता राजकीय पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहेत. बहुतेक कार्यकर्ते पक्षाची उमेदवारी मिळावी याकरिता पुढाºयांकडे हजेरी लावत असल्याची माहिती आहे. न.प. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पार्टी व इतर राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या अखाड्यात उतरविणार आहेत. बहुतेक कार्यकर्ते अध्यक्षपद आपल्याला मिळावे म्हणून समीकरण आखत असल्याचे दिसून येते. अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत झाली नसल्याने काही वरिष्ठ कार्यकर्ते संधी पाहून आपले राजकीय समिकरण बसविणार असल्याचे कळते. नगर परिषदेच्या हद्दीतील सुंदर नगर, अनिहा नगर, बनगाव-कामठा मार्ग, संत गाडगेबाबा नगर, कामठा चौक, आंबेडकर मार्गावरील परिसर, पुणे बसस्थानक मार्ग, सालेकसा मार्ग, तुकडोजी चौक, बनिया मोहल्ला, पोलीस स्टेशन मागील परिसर तसेच माल्ही, पदमपूर, रिसामा, किंडगीपार, बनगाव, कुंभारटोली, बिरसी आणि आमगाव आदी परिसरात अनेक सदस्यांना नागरिकांसमोर जावे लागत आहे. न.प.च्या निवडणुकीला बराच वेळ आहे. तोपर्यंत नागरिकांना आपल्या मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून नागरिकांच्या समस्येकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी होत आहे.कृउबासला स्वच्छ भारत उपक्रमाचा विसरबनगावच्या हद्दीत असलेली शेतकºयांची बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नाल्या तुंबलेल्या आहेत. तेथील गटारांचे दूषित पाणी काळसर स्वरुपात रस्त्यावर वाहत असते. बहुतेक ठिकाणी कचºयाचे ढिग स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची वाट लावत आहेत. परिसर घाणमुक्त करावे, कृउबासचे सचिव चव्हाण व संचालकांनी स्वच्छ भारत उपक्रमाची अंमलबजावणी करावी.