शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

अबब...२७ हजार क्विंटल धान झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:31 PM

जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी तब्बल २६ हजार ७७६ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली नाही.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा घोळ : २०१६-१७ च्या खरीप हंगामाची खरेदी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी तब्बल २६ हजार ७७६ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली नाही. तर या धानाची नोंद राईस मिलर्स अथवा जिल्हा पुरवठा विभागाकडे नसल्याने कोट्यवधी रूपयाचे धान गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून २७ हजार क्विंटल धान गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.गोंदिया जिल्ह्याची ओळख धान्याचे कोठार म्हणून आहे. एकूण कृषी क्षेत्राच्या ८० टक्के क्षेत्रात धान पिकांची लागवड केली जाते. सन २०१६-१७ च्या हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ५९ हजार ६३४ शेतकºयांकडून १९ लाख ३७ हजार ७८० क्विंटल ७० किलो धान खरेदी करण्यात आले होते. या धानाची किंमत २८४ कोटी ८५ लाख होती. या धानाच्या भरडाईची जबाबदारी ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची होती. त्यानुसार त्यांनी २०८ राईस मिलर्सला १९ लाख २३ हजार ३३१ क्विंटल धान भरडाईसाठी दिले. राईस मिलर्सने १९ लाख ११ हजार ३ क्विंटल धानाची भरडाई करु न १२ लाख ८० हजार ३७२ क्विंटल तांदूळ शासनाला जमा केला. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार सध्यास्थितीत सन २०१६-१७ च्या आधारभूत धान खरेदी पैकी केवळ १५.९१ क्विंटल तांदूळ राईस मिलर्सकडे शिल्लक असल्याची नोंद आहे. परंतु या हंगामात झालेली एकूण खरेदी व त्यानंतर राईस मिलर्सला दिलेल्या धानाची आकडेवारी बघितल्यास खरेदी केलेल्या धानापेक्षा तब्बल १४ हजार ४६६ क्विंटल धान कमी असल्याचे आढळले. तर भरडाईकरिता दिलेला धान व भरडाई झालेला धान यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तब्बल १२ हजार ३१०.७ क्विंटल धान कमी भरडाई झालयाचे उघडकीस आले. खरेदी केलेले आणि त्यानंतर भरडाईसाठी दिलेले व प्रत्यक्षात भरडाई झालेल्या धानाची आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण प्रत्यक्षात खरेदीच्या २६ हजार ७७६.७ क्विंटल धान कमी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे.ओल्या धानाच्या नावावर गोरखधंदा?शेतकऱ्यांचे ओले धान मार्केटींग फेडरेशन किंवा आदिवासी विकास विभागाकडून घेतले जात नाही. थोड्याफार प्रमाणात धान ओले असेल तर तूट थोड्या प्रमाणात असू शकते परंतु २७ हजार किलो नव्हे तर क्विंटल धान्याची तूट दाखविणे म्हणजे इतरांना शुध्द मुर्ख बनविण्याचा तर धंदा सुरू नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे खरेदी केलेले धान कर्मचारी, अधिकारी यांच्या मार्फत परस्पर विक्रीला तर गेले नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. धान खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी देताना काही महिन्याचा कालावधी लागतो. या दरम्यान धान वाळत असल्याने वजनात कमतरता येवून तूट निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्यक्षात झालेली खरेदी व भरडाईसाठी दिलेल्या धानात थोडा फरक राहणार आहे.-ए.के. सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.