शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेंगेपारवासीयांनी पकडला सागवान भरलेला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

 कोसमतोंडी कार्यालय अंतर्गत मालीजुंगा, रेंगेपार, गोंगले, मुरपार, लेडेंझरी, वनविभागाच्या जंगलातून अवैध लाकूड तोड वनरक्षकाचा संगनमताने केली जात असून वनविभागाने अजून प्रपत्र कार्यवाही न केल्याचे सुध्दा रेगेपारवासी बोलत आहेत. सध्या सरकारने जीएसटी लावली आहे. परंतु या परिसरातील ठेकेदार जीएसटी दुसऱ्या नावाने तयार करून लाकूड विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाबसुध्दा उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी :  परिसरातील ग्राम रेंगेपार येथील वनविभागाच्या जंगलातून सागवान तोडून वनविभागाचे अधिकारी सागवन भरलेला ट्रॅक्टर नेत असताना गावकऱ्यांनी थांबविले. गुरुवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडला असून अवैध सागवान नेले जात असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. शुक्रवारी (दि.१८) गावकऱ्यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना बोलावून पंचनामा करविला. सागवान वनविभागातील असून त्याचे प्रकरण तयार आले नव्हते. त्याचप्रकारे वनविभागातील वनरक्षक व ठेकेदारांनी संगनमत करून सागवन तोडल्याचे गावकरी बोलत आहेत. कोसमतोंडी कार्यालय अंतर्गत मालीजुंगा, रेंगेपार, गोंगले, मुरपार, लेडेंझरी, वनविभागाच्या जंगलातून अवैध लाकूड तोड वनरक्षकाचा संगनमताने केली जात असून वनविभागाने अजून प्रपत्र कार्यवाही न केल्याचे सुध्दा रेगेपारवासी बोलत आहेत. सध्या सरकारने जीएसटी लावली आहे. परंतु या परिसरातील ठेकेदार जीएसटी दुसऱ्या नावाने तयार करून लाकूड विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाबसुध्दा उघडकीस आली आहे. अशाच प्रकारचा सागवान तोडून विक्रीला नेला जात असावा अशाप्रकारे संशय गावकऱ्यांना आला. यातूनच गुरुवारी रात्री १ वाजता सागवन भरलेला ट्रॉली क्रमांक एमएच३५-एफ ४२३८ व इंजिन क्रमांक एमएच ३५-एएफ ५०९१ गावकऱ्यांनी पकडला. शुक्रवारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी व सहवनपाल कोसमतोंडी येथील सर्व अधिकाऱ्यांना बोलावून ट्रॅक्टरमधील सागवन जप्त करण्यात आले. त्यामुळे रेंगेपार येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. वनरक्षक मंदा बिसेन यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहेत. 

सागवन जप्त करून डोंगरगाव डेपोला जमा केले जाईल. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. -सुनील मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी रेगेपार येथे अवैध सागवन तोडल्या गेल्याची माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसोबत येऊन १७ मार्च रोजी रात्री सागवन गावातील ट्रॅक्टर बोलावून कोसमतोंडी येथे जप्त करण्यासाठी नेत असताना गावकऱ्यांनी थांबविले. -मंदा बिसेन  वनरक्षक रेंगेपार

 

टॅग्स :forest departmentवनविभाग