शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींच्या कळपाने घातला जांभळी परिसरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 21:57 IST

मागील महिनाभरापासून हत्तींच्या कळपाने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा हत्तींचा  कळप छत्तीसगड राज्यातून दाखल होता. पण ते अद्यापही परतीच्या मार्गाला लागले नसून त्यांचा मुक्काम गोंदिया व गडचिरोली  जिल्ह्यातील जंगल परिसरात आहे. दहा पंधरा दिवसांपूर्वी हा हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. पण ९ नोव्हेंबरला हा कळप परत जिल्ह्यात दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : गडचिरोली जिल्ह्यातून हत्तींच्या कळपाने बुधवारी (दि. ९) जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात प्रवेश केला. त्यानंतर हा कळप शुक्रवारी देवरी तालुक्यातील चिचगड,चिमणटोला,पालांदूर या परिसरात दाखल झाला  होता. दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा या हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी परिसरात एन्ट्री  करून धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिनाभरापासून हत्तींच्या कळपाने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा हत्तींचा  कळप छत्तीसगड राज्यातून दाखल होता. पण ते अद्यापही परतीच्या मार्गाला लागले नसून त्यांचा मुक्काम गोंदिया व गडचिरोली  जिल्ह्यातील जंगल परिसरात आहे. दहा पंधरा दिवसांपूर्वी हा हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. पण ९ नोव्हेंबरला हा कळप परत जिल्ह्यात दाखल झाला. उमरपायली येथील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा देवरी तालुक्याच्या दिशेने वळविला.  शुक्रवारी पालांदूर आणि चिमणटोला येथील शेतामध्ये हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून धानाचे पुंजणे आणि कापणी केलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा कळप गोठणगाव, इटियाडोह परिसरातील जांभळी परिसरात दाखल झाला. या परिसरातील धान पिकांचे नुकसान केल्याची माहिती आहे. दरम्यान याची माहिती मिळताच वनविभागाची चमू या परिसरात दाखल झाली असून,हत्तींच्या कळपावर नजर ठेवून आहे. हत्तींचा कळप याच परिसरात असल्याने गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचे आवाहन वनविभागाने गावकऱ्यांना केले आहे. 

धान कापणीचा हंगाम संकटात- सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी सकाळपासूनच शेतात असतात. काही शेतकऱ्यांची धान कापणी पूर्ण झाली असून त्यांनी शेतात धानाचे पुंजणे तयार करून ठेवले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेला धान पडून आहे. हत्तींचा कळप धानाचे पुंजणे आणि कापणी केलेल्या धानाचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. 

चार परिक्षेत्राचे चमू अलर्ट हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्यानंतर वन आणि वन्यजीव विभागाचे चमू अलर्ट झाले आहे. हत्तींचा कळप गोठगाव, जांभळी परिसरात दाखल झाल्यानंतर केशोरी,गोठणगाव, राजोली,तिखखुरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी या परिसरात दाखल झाले आहे. 

हत्ती नियंत्रक पुन्हा दाखल - हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घातल्यानंतर त्यांना नियंत्रणात करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील आठ ते दहा जणांचे समावेश असलेले हत्ती नियंत्रक पथक या परिसरात दाखल झाल्याची माहिती आहे.

आधी वाघ आणि आता हत्तींचा कळप - देवरी तालुक्यातील पालांदूर,चिमणटोला परिसरात मागील आठवडाभरापासून वाघाची दहशत आहे. त्यातच आता या परिसरात हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घालून नुकसान केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

टॅग्स :forest departmentवनविभाग