शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

९९७ कुटुंबांना मिळेल का? राष्ट्रीय बचत पत्र

By admin | Updated: November 6, 2016 00:50 IST

महाराष्ट्र सरकारने स्त्री भृ्रणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सुरू केली.

नरेश रहिले  गोंदिया महाराष्ट्र सरकारने स्त्री भृ्रणहत्या रोेखण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल १९९५ पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सुरू केली. १ एप्रिल २००७ ला सुधारित योजनेला मंजूरी दिली. या योजनेचा लाभ फक्त दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाना देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी मुलींच्या नावाने डाकघरात राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र तयार केले जाते. परंतु या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या मागील चार वर्षातील ९९७ लाभार्थ्यांना राष्ट्रीय बचत पत्र देण्यात आले नाही. मुलीच्या जन्माचे स्वागत करा असे सांगत मुलींना जन्म देऊन त्यांचे संगोपण करणारे जिल्ह्यात ३३७० दाम्पत्य आहेत. महिलांना सामाजिक जीवनात सुधार करण्याच्या दृष्टीकोणातून एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन केले. त्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासन द्वारे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजनेचा लाभ देण्यात येते. मागील ७ वर्षात ३३७० लाभार्थ्यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत २६७ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही. सन २०११-१२ या वर्षातील ५१०, सन २०१२-१३ या वर्षातील १५१,सन २०१३-१४ या वर्षातील १४५, सन २०१४-११ या वर्षातील १९१ असे एकूण ९९७ कुटंबाना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र देण्यामागील अडचण विचारल्यास डाकघराकडून प्रत्येक वेळी नविन फॉर्मेट दिला जातो. या योजनेंतर्गत आरोग्य विभागाला प्राप्त होणाऱ्या अर्जाला पाहून प्रमाणपत्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. परंतु डाकघारने या प्रमाणपत्राची संख्या निश्चीत केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. डाकघराच्या आॅनलाईन कामकाजामुळेही त्रास होतो. आरोग्य विभागाकडून लाभार्थ्याची स्वाक्षरी केली जाते. लाभार्थ्याचा पॅनकार्ड, आधार कार्ड व फॉर्मेट नुसार स्वाक्षरीची समस्या असते, असे सांगितले जाते. परंतु निधी अभावीही २६७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा व कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार यामुळे मुलींना जन्म देणाऱ्या कुटुंबाना त्यांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. असा मिळतो लाभ योजनेंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रोख व मुलीच्या नावाने ८ हजार रूपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास व्यक्तीला दोन हजार व दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार असे आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाण पत्रात दिले जाते. या योजनेसाठी लाभार्थी महाराष्टाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांचे नाव दारिद्र रेषेखालील यादीत असावे, पती किंवा पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्य सरकार मान्यता प्राप्त संस्था किंवा नोंदणीकृत रूग्णालयात १ एप्रिल २००७ नंतर होणे आवश्यक आहे. कन्या जन्मदात्यांना प्रोत्साहन द्या महाराष्ट्रात पुरूषांच्या जन्मदरामागे मुलींचे कमी प्रमाण आहे. मुलींना जन्माला घातल्यानंतर कुटुंब नियोजन करणाऱ्यांसाठी शासनाने सावित्रीबाई फुले योजना अमंलात आणली. परंतु या योजनेला पंगू बनविण्याचे काम आरोग्य विभागातील लिपीकांनी केल्यामुळे मागील चार वर्षातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. कन्या जन्मदात्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेचा लाभ त्वरीत देण्याची गरज आहे.