शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

९० वर्षांची म्हातारी पेंशनसाठी बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:22 IST

शासनाकडून श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना राबविली जाते. त्यासाठी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्यांना लाभ दिला जातो. त्यापैकीच एक परसटोला येथील ताराबाई असून त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली तरी बँकेत त्या पेंशनसाठी जात आहेत.

ठळक मुद्देश्रावणबाळ वृद्धपकाळ योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : शासनाकडून श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना राबविली जाते. त्यासाठी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्यांना लाभ दिला जातो. त्यापैकीच एक परसटोला येथील ताराबाई असून त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली तरी बँकेत त्या पेंशनसाठी जात आहेत.परसटोला गाव केशोरीपाूसन १० किमी अंतरावर आहे. परिसरात राष्ट्रीयकृत बँक तिबेट कॅम्प येथे आहे. तेथे युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. सदर बँकेमध्ये ये-जा करण्यासाठी प्रवासाची सोय नाही. त्यामुळे बँक ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.ताराबाईचा पुतण्या सिद्धार्थ सांगोळे यांनी एका सोबत्यासह ताराबाईला मोटार सायकलवर बँकेत आणले होते. दरम्यान त्यांना दुपारच्या १२ ते ४ वाजेपर्यंत ताटकळत रहावे लागले. ताराबाई उभ्या राहू शकत नाही. उभे राहण्यासाठी दोन माणसांचा आधार घ्यावा लागतो. दिवसभर बसून त्यांना कंबरेचा त्रास वाढल्याने असह्य वेदना होऊ लागल्या. तेवढ्यात लोकमतचे प्रतिनिधी यांनी ताराबाईची विचारपूस केली व लगेच बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून पैशाची उचल करवून दिली.विशेष म्हणजे वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या व्यवहारासाठी बँकेत वेगळी व्यवस्था करून त्वरित लाभ देण्याची उपाययोजना करण्यात यावी. असे झाले तर त्यांना होणारा त्रास वाचू शकेल.चढाव्या लागतात १६ पायऱ्यायुनियन बँक आॅफ इंडिया शाखा तिबेट कॅम्प येथे आहे. शाखा वरच्या माळ्यावर आहे. त्यामुळे १६ पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या उभ्या स्वरुपात आहेत. म्हाताऱ्यांना वर चढता येत नाही. बँक कर्मचारी सह्यांकरिता खाली येतो. परंतु सही घेवून अग्रक्रमाने काम करीत नाही. त्यामुळे मोठाच त्रास सहन करावा लागतो.