शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीसाठी येणाऱ्या ९० टक्के महिलांना ‘अ‍ॅनेमिया’

By admin | Updated: May 28, 2015 01:23 IST

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्याविषयी जनजागृती नाही.

असंतुलित आहाराचा परिणाम : रुग्णालयांमध्ये महिला स्त्री रोग तज्ज्ञांचा अभावनरेश रहिले गोंदियाआदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्याविषयी जनजागृती नाही. असंतुलित आहारामुळे जिल्ह्यातील ९० टक्के महिलांना अ‍ॅनेमिया असतो, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अ‍ॅनेमियामुळे महिलांना विविध आजारांना समोरे जावे लागते. गोंदिया जिल्ह्यात मुख्य जेवण म्हणजे भात व वांग्याची भाजी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जेवणात दररोज वरण नसतोच. महिलांना आर्यन (लोह) मिळत नसल्यामुळे त्यांच्यात रक्त कमी तयार होते. परिणामी त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागते. गोंदिया जिल्ह्यातील २ हजार ८७५ गर्भवती महिलांना अनेमीया असल्याची माहिती सन २०१४ या वर्षात जानेवारी ते डिसेंबर या काळात मिळाली. गर्भवती झाल्यापासून तर प्रसूती होईपर्यंत महिला संकरीत आहार सेवन करीत नसल्यामुळे त्यांना अनेमीया होतो. यामुळे गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी जीवाशी खेळावे लागते. त्यांच्या नातेवाईकांना रक्ताची जुळवाजुळव करावी लागते. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश महिला जेवणात भातासोबत वांग्याची भाजी घेतात. त्या शिवाय त्यांच्या जेवणात दुसरे कसलेही प्रोटीन, विटामीन किंवा आर्यन (लोह) राहात नसल्यामुळे महिलांना अ‍ॅनेमिया होतो. याचा त्रास त्या महिलांना प्रसूतीच्या काळात मोठ्या प्रमाणात होतो. आहाराकडे गोंदिया जिल्ह्यातील महिलांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या अनेमीयाला महिला स्वत:हून ओढावून घेतात. गोंदिया जिल्ह्यात २०१४ या वर्षभरात २ हजार ८७५ महिलांना अ‍ॅनेमिया असल्याने त्यांना प्रसूतीच्या वेळी रक्त द्यावे लागले. जानेवारी ते फेबु्रवारी २०१५ या दोन महिन्यात २४८ महिलांना अ‍ॅनेमिया असल्याचे लक्षात आले. गोंदिया जिल्ह्यात सिकलसेलचेही प्रमाण बरेच आहे. त्यामुळे त्यांना रक्त पुरवठा करण्याबरोबर अनेमिया असलेल्या महिलांना प्रसूतीदरम्यान रक्त पुरवावे लागते. आरोग्याकडे दुर्लक्ष करून वांग्याची भाजी व भातावर जीवन जगणाऱ्या महिलांमध्ये अनेमिया मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ग्रामीण भागात आळण, कुकसा भाजी, कडी अशा प्रकारे भातासोबत भाजीचा वापर होत असल्यामुळे या भाज्यांमधून लोह, आर्यन व प्रोटिन मिळत नसल्याने महिलांना अनेमिया होतो. जंक फूडला ठेवा दूरजंक फूड खाने प्रत्येकाला हाणीकारक आहे. जंक फूडमुळे लोहचे प्रमाण कमी होते. जंकफूड सोबत इतर अन्नातील मुलद्रव्ये शरिरात न राहता त्या बरोबर बोहर पडते. जंक फूड मुळे पोषण आहराकडेही दुर्लक्ष होते. त्यासाठी जंक फूड नाकारण्याचे आवाहन डॉक्टरांकडून नेहमीच केले जाते. गंगाबाईत उसनवारीवर स्त्रीरोग तज्ज्ञवर्षाकाठी सात हजाराच्या घरात प्रसूती करणाऱ्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात शासनाने सात स्त्रीरोग तज्ज्ञांचे पद मंजूर केले. परंतु या रूग्णालयात सद्यस्थितीत एकच स्त्रीरोग तज्ज्ञ कार्यरत आहे. परंतु ते ही कामानिमित्त सुट्टीवर असल्याने उसनवारीवर आणलेल्या दोन स्त्रीरोग तज्ज्ञांना येथे सेवा द्यावी लागत आहे. गंगाबाई स्त्री रूग्णालयात सात पदे मंजूर असतांना डॉ. सायास केंद्र, डॉ. योगेश सोनारे व डॉ. शीतल खंडलेवाल या तिघांना नियुक्ती देण्यात आली आहे. परंतु डॉ. योगेश सोनारे यांचे लग्न असल्यामुळे ते महिनाभरापासून सुट्टीवर आहेत. शितल खंडेलवाल आजारी असल्यामुळे त्याही सुट्टीवर आहेत. एकटे डॉ. सायास केंद्र काम करीत होते. परंतु तेही स्वगावी गेल्यामुळे या रूग्णालयात उसनवारीवर रजेगाव ग्रामीण रूग्णालयातील डॉ. आशा अग्रवाल व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉ. दुर्गादास पटले यांना आणण्यात आले. गर्भाशयाचा आजार अनेक महिलांनागोंदिया जिल्ह्यात पूर्वी लहान वयातच लग्न होत असते. त्या महिला माती व दगड काम मोठ्या प्रमाणात करीत असत त्यामुळे अनेक महिलांचे गर्भाशय खराब होत असल्याचे चित्र आहे. अनेक महिलांचे गर्भाशय खराब झाल्यामुळे त्या गर्भपिशवी काढण्यासाठी गंगाबाईत येतात.