शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेला ९ कोटींचा निधी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नामुळे नगर पालिकेला चालू वित्तीय वर्षात नऊ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून...

तिरोडा : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नामुळे नगर पालिकेला चालू वित्तीय वर्षात नऊ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पालिकेच्या खात्यात हा निधी जमा झाला आहे. लवकरच याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजयसिंह गौर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तिरोडा नगरपरिषद ‘क’ श्रेणीत असून घर कर वगळता आर्थिक आवकसाठी अन्य स्त्रोत जवळपास नगण्य आहे. त्यामुळे मिळालेल्या या निधीचा मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. मिळालेल्या नऊ कोटी ८९ लाख रुपयांपैकी चार कोटी ७१ लाख रुपये वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत बहुद्देशीय सभागृहाच्या बांधकामाकरिता उपलब्ध झाले आहे. हे सभागृह दोन मजली राहणार असून प्रत्यक्ष बांधकामावर तीन कोटी ८० लाख रुपये वापरण्यात येणार असून इतर बाबींकरीता उर्वरीत निधी वापरण्यात येणार आहे. एक कोटी ७० लाख रूपये वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत तरणतालाच्या बांधकामाकरिता आहेत. आजतागायत शहरामध्ये खाजगी व सरकारी कुठल्याही प्रकारचे तरणताल उपलब्ध नाही. त्यामुळे आधुनिक पध्दतीचे तरणताल तिरोडावासीयांकरिता निर्माण केले जाणार आहे. दलितोत्तर विकास निधी अंतर्गत ९२ लाख रुपये प्राप्त झाले असून यामध्ये पोलीस स्टेशन ते मोहनलाल चौक असा ७०० मीटरचा दुपदरी रस्ता दुभाजक, भूमीअंतर्गत नाल्या, पादचारी मार्ग विद्युतीकरणासह बांधण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत मुस्लीमटोला येथे शादीखाना बांधकामाकरिता ५६ लक्ष रुपये प्राप्त झाले आहे. तसेच रस्ता अनुदान निधी अंतर्गत दोन कोटी रुपयांतून डांबरी रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.(तालुका प्रतिनिधी)