शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

९६३ सार्वजनिक श्रींची स्थापना

By admin | Updated: September 6, 2016 01:39 IST

संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली. जिल्हाभरात यावर्षी

उत्सवासाठी चोख बंदोबस्त : १० बीट मार्शल करणार पेट्रोलिंगगोंदिया : संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली. जिल्हाभरात यावर्षी ९६३ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत वाजतगाजत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सुरू होती. याशिवाय घरोघरी श्रीगणेशाच्या छोट्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. पुढील १० दिवस चालणारा हा उत्सवा शांततेच्या वातावरणात पार पडावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. याशिवाय ३७५ होमगाडर््सची ड्युटी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गावात एकोपा राहण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीमेच्या सहकार्याने ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे. पूर्वी एका गावात अनेक गणेशमूर्ती असायच्या. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा यापासून तर कोणाची मिरवणूक पुढे राहील यापर्यंत वाद व्हावचे. यातून गावाची शांतता धोक्यात येत होती. परंतू एका गावात एकच सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याचा प्रयोग जिल्ह्यात ४६२ गावांत यशस्वी होत आहे. आमगाव, सालेकसा, गोंदिया शहर, रागनगर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, डुग्गीपार, देवरी, चिचगड, अर्जुनी/मोरगाव, केशोरी, नवेगावबांध या पोलिस ठाण्यांतर्गत ‘एक गाव एक गणपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ४ हजार ५४७ ठिकाणी खासगी गणेशमूर्तींची स्थापन करून हा उत्सव साजरा केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी) चोख बंदोबस्तासाठी पथके गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत. दंगल नियंत्रक पथक ४ ठेवण्यात आले आहेत. ३६ लोकांचे दोन शिघ्र कृती दल, १० बीट मार्शल, २ निर्भया पथक, चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकिंग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकिंग फोर्स असे सहा फोर्स तयार करण्यात आले आहेत. त्यात सहा अधिकारी व ५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध, नाशक पथकही नेमण्यात आले आहेत. ३२० पुरूष होमगार्ड तर ५५ महिला होमगार्ड बंदोबस्त करणार आहेत. ग्राम सुरक्षा दलही सज्ज गावातील सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला. गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी पोलीस बंदोबस्ताशिवाय पार पाडता याव्या यासाठी तंटामुक्त समित्यांनी आपापल्या गावात ग्राम सुरक्षा दलाला सज्ज केले आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दलाने पुढाकार घेतला आहे. ‘लोकमान्य उत्सवा’च्या सहभागावर प्रश्नचिन्ह शासनाने गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी तालुकास्तरापासून विभागस्तरापर्यंत पुरस्कार ठेवले. त्यासाठी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे नोंदणी क्रमांक अत्यावश्यक होते. स्वदेशी, साक्षरता, बेटी-बचाओ, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन या पाच मुद्यांवर समाजजागृती करणारे देखावे गणपती उत्सवात मांडून मंडळांना जनजागृती करायची होती. त्यामुळे मंडळांना तालुकास्तरावर तीन, जिल्हास्तरावर तीन व विभाग स्तरावर तीन पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. परंतु बहुतांश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे मंडाळांची नोंदणी न केल्यामुळे या स्पर्धेत मंडळे उतरू शकणार किंवा नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. गपणती उत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. मूर्तीच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी घ्यावी, जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी. जातीय सलोखा कायम राखण्यासाठी तंटामुक्त गाव समित्यांनी प्रयत्न करावे. - डॉ.दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, गोंदिया.