शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

९५ अपंग मुलांना कॅलिपर्सचे बळ

By admin | Updated: August 9, 2015 01:52 IST

सर्वसामान्य मुलांप्रमाणे अपंग मुलांनाही सन्मानाने समाजात वावरता यावे याकरिता सर्व शिक्षा ..

सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीगोंदिया : सर्वसामान्य मुलांप्रमाणे अपंग मुलांनाही सन्मानाने समाजात वावरता यावे याकरिता सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून मोजमाप शिबिरात कॅलीपर्स करीता निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९५ अपंग मुलांना कॅलीपर्स वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले. यावेळी मुकाअ दिलीप गावडे, सभापती पी.जी. कटरे, विमला नागपुरे, छाया दसरे व सदस्य शोभेलाल कटरे, किशोर तरोणे, रमेश लिल्हारे, जियालाल लोणारे, ललिता चौरागडे, वालदे, रजनी गौतम इत्यादी जि.प. सदस्य व डॉ. सुमीत शर्मा, डॉ. अमन भांडारकर, शिक्षणाधिकारी घनशाम पाटील व उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी उपस्थित होते.अपंगत्व शिक्षण घेताना अडथळा समोर येऊ नये याकरिता सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण विभागांतर्गत विविध साहित्याचे वाटप करण्यात येते. यामध्ये प्रथम साहित्याकरिता निवडण्यात आलेल्या मुलीचे केंद्र शासनाच्या अलिम्को या संस्थेच्या तज्ञांद्वारे मोजमाप करण्यात येते. त्यानंतर सर्व निवडण्यात आलेल्या अपंग मुलांना साहित्य वाटप करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून काल जैन कुशल भवन येथे आयोजित शिबिरात जिल्ह्यातील ९५ अपंग मुलींना कॅलिपरचे वाटप करुन पालकांना वापरा संबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुकाअ यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतेवेळी जिल्हा परिषद अपंगांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून प्रत्येक योजना प्रभाविपणे राबविण्यात येईल याची ग्वाही दिली. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी घनश्याम पाटील, संचालन दिलीप बघेले तर आभार विभाग प्रमुख विजय ठोकणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समन्वयक विलास मलवार, विस्तार अधिकारी नीलकंठ सिरसाठे, समन्वयक गजानन धावडे, थानसिंह बघेले, बुद्धभूषण सोनकांबळे, संजेश मते, प्रदीप वालदे, राजकुमार गौतम, मुक्ता पोगळे, विनिता यादव, दीपा बिसेन, आम्रपाली उके, चंद्रकुमार धुवारे, सतीश गजभिये, अमोल डोंगरदिवे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)