शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

९४ टक्के तलावांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:36 IST

शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसरले आहेत. काही लघु प्रकल्पसुद्धा कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देसजीवांवर जलसंकट : मामा तलावांसह लघु प्रकल्पही पडले कोरडे

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसरले आहेत. काही लघु प्रकल्पसुद्धा कोरडे पडले आहेत. आतापासूनच जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु झाल्याचे चित्र आहे.तालुक्यात एप्रिल महिन्यातच पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाल्याने पुढील तीन महिने पाण्याअभावी कसे जाणार, अशी चिंता तालुकावासीयांना सतावित आहे. तालुक्यात माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव) एकूण १६१ असून यापैकी जेमतेम सहा तलावांत थोड्या प्रमाणात पाणी शिल्लक असून बाकीचे सर्व तलाव कोरडे झाले आहेत. मामा तलावांपैकी फक्त ३.७२ टक्के तलावांत पाणी उरले असून तेसुद्धा पुढील एका महिन्यात संपूर्ण नाहिसे होईल व सर्व मामा तलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.लघू पाटबंधारे विभागातर्गंय तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यापैकी पाच तलावांमध्येच पाणी शिल्लक आहे. एकूण १७ टक्के तलावांत पाणी शिल्लक आहे. लघु सिंचन प्रकल्पाचे एकूण १२० तलाव असून या तलावांपैकी २० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. तलावाच्या भरवशावर पाण्याची गरज भागविणारे प्राणी कुठे जातील, असा प्रश्नसुद्धा उपस्थित झाला आहे.मध्यम प्रकल्पात मोजकाच पाणीसाठातालुक्यात पुजारीटोला धरणासह कालीसरार, मानागड, मानाकुही यासारखे मध्यम प्रकल्प सुद्धा आहेत. परंतु या मध्यम प्रकल्पामध्येही पुरेसा पाणीसाठा राहिलेला नाही. पुजारीटोला धरणात राखीवपेक्षा कमी पाणी असून या धरणातून मोेठे कालवे गेलेले आहेत. ते सालेकसासह आमगाव, गोंदिया तालुक्याला आणि मध्यप्रदेशच्या लांजी, किरणापूर तालुक्याला सुद्धा पाणी पुरवठा करतात. परंतु यासाठी सिरपूरबांधचे पाणी असून वितरित करावे लागते. मात्र जलाशयात मोजके पाणी असून पाण्याचा अपव्यय थांबविणे मोठे आवाहन आहे.साठवण बंधारे १०० टक्के कोरडेतालुक्यात एकूण लोप बंधारे ४१ असून साठवण बंधारे १६८ च्या संख्येत आहेत. परंतु सदर दोन्ही प्रकारचे बंधारे कोरडे पडले असून सध्या शंभर टक्के उपयोगहीन झाले आहेत. लघू बंधारे व साठवण बंधारे जनावरांसाठी पाण्याची सोय म्हणून फार उपयोगी असतात. परंतु आता त्यात पाणीच नाही. त्यामुळे त्याकडे कोणी ढुकूनसुध्दा पाहत नाही. सदर बंधाऱ्यांमध्ये पाणी उरले नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत धोका निर्माण होत आहे. परंतु त्यापेक्षा मोठे संकट वन्यप्राण्यांच्या जीवावरही ओढवले आहे. त्यामुळे साठवण बंधाºयामध्ये शासनस्तरावर तात्पुरता पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.काही मोजक्या तलावांमध्ये पाणीतालुक्यातील ९० टक्क्यांच्या वर तलाव कोरडे झाले असून काही गावामध्ये पाण्याचे संकट भासू लागले आहेत. तर तालुक्यातील काही मोजके तलाव आहेत, त्यात १० ते १५ टक्के जलसाठा उरलेला आहे. अनेक ठिकाणी पाच टक्केही जलसाठा राहिला नाही. मामा तलावांपैकी हलबीटोला, झालीया, कावराबांध, जोशीटोला, मरकाखांदा, रामसागर (मानागढ) येथील तलावांत काही प्रमाणात पाणी उरले आहे. लघु पाटबंधारेपैकी भजियादंड, पाऊलदौना, पिपरिया, बिजेपार या ठिकाणी पाण्याचा साठा शिल्लक आहे.