शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

नऊ ग्रामपंचायतीत निवडले जातील ८१ सदस्य

By admin | Updated: March 29, 2015 01:43 IST

तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपणार होता.

विजय मानकर सालेकसासालेकसा- तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपणार होता. त्यामुळे पुढील दोन महिने निश्चितपणे ग्रामपंचायतींवर शासन करीत असतानाच अचानक ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून निवडणूक आयोगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एकीकडे निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे, तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे मार्च महिना संपण्यापुर्वीच राजकीय वातावरणात तापत आहे. तालुक्यातील एकूण ४२ ग्राम पंचायतीपैकी १० ग्राम पंचायतीचा कार्यकाळ दोन महिन्याचा शिल्लक राहिला आहे. त्यात सालेकसा ग्राम पंचायतीला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्याने ती आधीच यातून बाद झाली आहे. त्यामुळे आता येत्या २२ एप्रिलला एकूण नऊ ग्राम पंचायतीत निवडणुका रंगणार आहेत. एकूण नऊ ग्राम पंचायतीत ८१ सदस्य निवडून येतील. यात ४५ महिला आणि ३६ पुरुष सदस्य असून महिला ५५ टक्के तर पुरुष ४५ टक्के राहतील. त्यात एका ग्रामपंचायतच्या एका जागेवर पोटनिवडणुकीत सुद्धा महिला सदस्य निवडली जाणार आहे.ज्या नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहेत, त्यात कारुटोला येथे एकूण ११ सदस्य आहेत. त्यात सहा महिला व पाच पुरुष, कावराबांध येथे ११ सदस्यांपैकी सहा महिला, पाच पुरुष, कोटजामुरा येथे सात सदस्यांपैकी चार महिला व तीन पुरुष, कोटरा येथे नऊ सदस्यांमध्ये पाच महिला व चार पुरुष, मानागड येथे एकूण सात सदस्यांमध्ये चार महिला व तीन पुरुष, मुंडीपार येथे ११ सदस्यांमध्ये सहा महिला व पाच पुरुष, पाऊलदौना येथे नऊ सदस्यांमध्ये पाच महिला चार पुरुष, पोवारीटोला येथे सात सदस्यांमध्ये चार महिला व तीन पुरुष, सातगाव येथे नऊ सदस्यांमध्ये पाच महिला आणि चार पुरुष तसेच दरेकसा येथे एक महिला सदस्य निवडण्यात येणार आहे. सदस्यपदाचे आरक्षण आधीच जाहीर झालेले आहेत. नऊ ग्राम पंचायतीच्या एकूण ८१ सदस्यांमध्ये अनुसूचित जातीचे सहा सदस्य, अनुसूचित जमातीचे १६ सदस्य, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे २० आणि सर्वसाधारण महिला १७ तर सर्वसाधारणचे एकूण २२ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे.विविध ग्रामपंचायतींचे आरक्षणकारुटोला ग्राम पंचायतीत अनुसूचित जाती महिला एक, अनुसूचित जमाती महिला एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन पुरुष एक, सर्वसाधारण महिला दोन आणि सर्वसाधारण चार असे एकूण अकरा सदस्य निवडुण येतील. कावराबांध ग्राम पंचायतीत अनुसूचित जाती जमातीसाठी कोणतेच आरक्षण नसून येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन पुरुष एक सर्वसाधारण महिला चार आणि सर्वसाधारण चार असे एकूण अकरा सदस्य निवडले जातील. कोटजमूरा ग्रामपंचायत येथे अनुसूचित जाती महिला एक, नामाप्र महिला एक पुरुष एक, सर्वसाधारण महिला दोन आणि सर्वसाधारण दोन असे एकूण सात सदस्य निवडले जातील. कोटरा येथे अनू जाती महिला एक, अनुजमाती महिला दोन, पुरुष एक, नामाप्र महिला एक, पुरुष एक सर्वसाधारण महिला एक आणि सर्वसाधारण दोन असे एकूण नऊ सदस्य निवडले जातील. मानागड येथे सात पैकी अनुसूचित जामातीचे तीन महिला तीन पुरुष आणि एक नामाप्र महिला सदस्य राहिल. मुंडीपार येथे अनु.जाती महिला एक, अनु.जमाती महिला पुरुष प्रत्येकी एक, नामाप्र महिला दोन पुरुष एक, सर्वसाधारण महिला दोन आणि सर्वसाधारण तीन असे एकूण अकारा सदस्य निवडले जातील. पाऊलदोना येथे नऊ जाती व जमातीची प्रत्येकी एक महिला, नामाप्रचे प्रत्येक एक महिला पुरुष तर दाने सर्वसाधारण महिला आणि तीन सदस्य सर्वसाधारण निवडुण येतील. पोवारीटोला येथे अनु.जातीसाठी आरक्षण नसून अनु. जमातीसाठी एक महिला एक पुरुष तर नामप्रसाठी ही प्रत्येकी एक महिला पुरुष आणि दोन महिला सर्वसाधारण तर एक सर्वसाधाण पदासाठी राहील. सातगाव येथे अनु.जाती, जमातीची प्रत्येकी एक महिला, नामाप्रची एक महिला एक पुरुष आणि सर्वसाधारण महिला दोन तर खुल्या प्रवर्गाचे तीन सदस्य निवडले जातील, विशेष म्हणजे अनु. जातीचे सर्व सहा सदस्य महिलासाठीच राखीव आहेत. आणि ते कारुटोला, कोटजमूरा, कोटरा, मुंडीपार, पाऊलदोना, पोवारीटोला आणि सातगाव येथे प्रत्येकी एक सदस्याचा समावेश आहे.