गोंदिया : तालुक्याच्या आसोली येथील जिराबाई बसंत खरोले (५०) या महिलेकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ एप्रिल रोजी मोहफुलाची दारू व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, पोलीस नायक जितेंद्र डिब्बे यांनी गोंदिया ग्रामीण येथील अवैध धंद्यांवर धाड टाकली. यात आरोपी जिरा बसंत खरोले (५०) रा. आसोली हिच्या घरून १० लिटर हातभट्टीची दारू किंमत २००० हजार, २०० किलो मोहफुल किंमत ६ हजार असा एकूण ८ हजारांचा माल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५ (ई), अन्वये गुन्हा दाखल केला आहे.