शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पतसंस्थेत ८० लाखांचा घोळ?

By admin | Updated: September 20, 2015 02:21 IST

गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत मागील व नवीन ताळेबंद पत्रकात तफावत आढळून आली.

संचालक डोंगरवार यांचा आरोप : सभासदांच्या लाभांशावर परिणामगोंदिया : गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत मागील व नवीन ताळेबंद पत्रकात तफावत आढळून आली. ८० लाखा रुपयांचा घोळ झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संचालक किशोर डोंगरवार यांनी सभेत मागील व नवीन ताळेबंद पत्रकाविषयी सत्तारुढ संचालकांना जाब विचारुन धारेवर धरले.गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत ३१ मार्च २०१५ अखेर निव्वळ नफा १ कोटी ८७ लाख हजार ७६८ रुपये झाला आहे. तसेच ताळेबंद पत्रक सर्व संचालकांना ८ आॅगस्टच्या सभेकरिता पाठविण्यात आलेल्या जमाखर्च पत्रकात लिहिण्यात आले. परंतु १७ आॅगस्टच्या सभेकरिता पाठविण्यात आलेल्या ताळेबंद पत्रकात संस्थेचा निव्वळ नफा १ कोटी ८७ लाख १ हजार ७६८ रुपयांवरुन १ कोटी ७ लाख २८ हजार ३५ रुपयांवर आणण्यात आला. दरम्यान आयोजित सभेत पतसंस्थेचे संचालक किशोर डोंगरवार यांनी मागील व नवीन ताळेबंद पत्रकाविषयी सत्तारुढ संचालकांना जाब विचारला. नंतर ३१ आॅगस्टला ताळेबंद पत्रक मंजुरीबाबत सभा बोलविण्यात आली. त्या सभेत सभासदांचे हित लक्षात घेवून संस्थेचा नफा ३१ मार्च रोजीचा घेण्यात यावा, यावर संस्थाध्यक्षांनी एनपीए, कर्मचारी, ग्रॅच्युईटी व घेणे व्याज या तरतुदीवर ८० लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. तेव्हा विरोधी संचालकांनी मागील कित्येक वर्षापासून अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या नाहीत. सदर जमाखर्च ३१ मार्च अखेर असून, या कालावधीत एनपीए तरतूद ३१ लाख, ग्रॅच्युईटी ३७ लाख, घेणे व्याज १६ ला हे खर्च झाले नसतानाही जमाखर्च पत्रकात खर्च म्हणून कसे दाखविले, याचा जाब विचारला असता, संचालक मंडळ निरुत्तर झाले. अशा प्रकारच्या तुघलकी व सभासदांचे हित न जोपासणाऱ्या सत्तारुढ संचालक मंडळाची तक्रार जिल्हा दुय्यम निबंधकाकडे विरोधी संचालक तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)शिक्षक पतसंस्था ही शिक्षकांच्या घामातून गोळा केलेल्या पैशातून अस्तित्वात आली. यापूर्वी असलेल्या सत्ताधारी मंडळीनी अनेक खड्डे खोदून ठेवले. ते बुजविण्याची जबाबदारी आमच्यावर आली. वाईट, संशयित व बुडित (एमपीएस) ही तरतूद सरकार तत्वानुसार करण्यात आली. त्याचबरोबर इमारत फंडात कोट्यवधी रुपयांचा घोळ करुन डिव्हिडंट फंड म्हणून वाटप केला. ते चुकीचे होते. सहकार कायद्याचे पालन करत तेच खड्डे भरण्याकरिता ८० लाख रुपये वेगळे काढून ठेवण्यात आले. यात कसल्याही प्रकारचा घोळ नाही. ज्यांनी आरोप केले तेदेखील यापूर्वीच्या सत्ताधारी मंडळात उपाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी स्वत: या प्रकरणाचा उलगडा करण्याऐवजी आरोप करणे बिनबुडाचे आहे.- वीरेंद्र कटरेअध्यक्ष, शिक्षक सहकारी पतसंस्था