शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्ट्यांवरील धाडीत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: June 28, 2015 01:08 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनपासून जिल्ह्यात लागू झाली आहे.

निवडणुकीसाठी दक्ष : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईगोंदिया : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनपासून जिल्ह्यात लागू झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यादरम्यान सुरू केलेल्या धाडसत्रात जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्ट्या उध्वस्त केल्या. त्यात मोहाफुल व देशी दारूवरील धाडीत ६८ गुन्हे नोंदवून ३७ आरोपींना अटक करण्यात आली.२२ ते २४ जूनदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने व पोलीस विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी घालून २२ गुन्हे नोंदविले. त्यामध्ये १२ वारस गुन्हे व १० बेवारस भट्ट्यांचा समावेश आहे. त्यातील १२ आरोपींना अटक केली. तसेच मोहा सडवा १४,११० लिटर, मोहा दारू ५१८ लिटर आणि इतर साहित्य जप्त केले. त्याची एकूण किंमत ३ लाख ६७ हजार २९५ रुपये आहे. ५ ते २० जूनदरम्यान मोहा सडवा ३००० लिटर, मोहा दारु १५३ लिटर, देशी दारू ६ लिटर व हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३ लाख ५४ हजार ६३३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून २७ आरोपींना अटक केली. त्यात ४६ गुन्हे नोंदविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)मुंबईतील दारूबळीने विभाग झाला दक्षमुंबई येथे मालवानी या ठिकाणी विषारी दारू दुर्घटनेनंतर जिल्ह्यात अवैध दारू धंद्यावर व हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. सर्व अवैध दारू निर्मिती, विक्री केंद्रे तसेच हातभट्ट्या समूळ नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक बी.जी. भगत, दुय्यम निरीक्षक संजय बोडेवार, एम.के. चिमटवार, आर.के. निकुंभ, हुमे, जी.एच. भगत, एस.बी. रहांगडाले, तऱ्हाटे, पागोटे, मेश्राम, ढाले, ढोमणे, मुनेश्वर, बंसोड, उईके, फुंडे व वाहन चालक मडावी, सोनबरसे यांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार ९१८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.