शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सात गावांमध्ये आठ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 00:25 IST

सालेकसा तालुक्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या वाटचाल करीत असून या योजनेमुळे ...

जलयुक्त शिवार योजना : २०१७-१८ साठी निवड, २३० कामांचा धडाका विजय मानकर । लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सालेकसा तालुक्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या वाटचाल करीत असून या योजनेमुळे यंदा आणखी सात गावे सुजलाम सुफलाम होण्याच्या वाटेवर येत आहेत. तालुक्यातील सात गावांची निवड २०१७-१८ या वर्षासाठी झाली असून मागील तीन वर्षात तालुक्यातील एकूण २८ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यात २०१५-१६ या वर्षात १३ गावे आणि २०१६-१७ या वर्षात आठ गावांची निवड करण्यात आली होती. २०१५-१६ या वर्षी १३ गावांची निवड झाली होती. त्यापैकी जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली असून २०१६-१७ वर्षातील आठ गावांची कांमे यंदा प्रगतीपथावर आहेत. ती सर्व कामे पावसाळापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन सात गावांची कामे येत्या वित्त वर्षात पूर्ण करण्यात येतील. जलयुक्त शिवार योजनेत कामासाठी तीन बाबींचा समावेश असून पहिली बाब म्हणजे मंजूर अस्तीत्वातील योजनेंतर्गत जलंधारण कामे पूर्ण दुरुस्ती. दुसरी बाब म्हणजे नव्याने हाती घ्यावयाची कामे आणि तिसरी बाब म्हणजे अस्तीत्वातील जलस्त्रोताची दुरुस्ती व बळकटीकरण व गाळ काढणे या तीन बाबीचा समावेश असतो. आपल्या तालुक्यात पहिल्या बाबीची कामे निरंक अूसन दुसऱ्या आणि तिसऱ्या बाबीची कामे विविध यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येतील. यात विशेष करुन तालुकास्तरावरील पाच यंत्रणाकडे जलयुक्त शिवाराचे काम असेल यात कृषी विभाग, लघू पाटबंधारे विभाग, वन विभाग, लघू पाटबंधारे जल विभाग आणि पंचायत समिती या एकूण पाच यंत्रणाचा समावेश आहे. नव्याने हाती घ्यावयाची कामे याबाबी अंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून एक कोटी ३९ लाख ९२ रुपये रकमेची १०१ कामे केली जातील. लघू पाटबंधारे जि.प. विभागाद्वारे एक कोटी २४ लाख रुपयांची ६० कामे केली जातील. वन विभागामार्फत तीन कोटी तीन लाखांची ११ कामे केली जातील. लघू पाटबंधारे जल विभाग द्वारा एक कोटी ५९ लाख ३६ हजार रुपयांची ११ कामे केली जातील आणि पंचायत समिती मार्फत दहा लाख ३४ हजार रुपये रकमेची एकूण सात कामे केली जातील असे एकूण सात कोटी ३६ लाख ६६ हजार रुपयाची एकूण १९० कामे नव्याने हाती घेतलेली असणार. तिसऱ्या बाबीतील एकूण ४० कामांचा समावेश असून ही सर्व कामे कृषी विभागामार्फत होणार असून या कामाची अंदाजित रक्कम २० लाख ऐवढी आहे. दोन्ही बाबीमध्ये कृषी विभागाकडून एक कोटी ५९ लाख ९२ हजार रुपये रकमेची कामे केली जातील. पाचही यंत्रणेकडून एकंदरित सात कोटी ५६ लाख ६६ हजार रुपये रकमेची २३० कामे. तिसऱ्या टप्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत होणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांच्या शिवारात नाला खोलीकरण, बोडी दुरुस्ती, गाळ काढणे या प्रकारच्या कामांवर अधिक भर देण्यात येत असून गावाच्या शिवारात पाण्याचे स्त्रोत वाढवून विविध उपाययोजना, वर्षभर पाणी मिळावे व जमिनीत पाण्याची पातळी वाढावी या बाबीवर जास्त भर देण्यात येत आहे. याशिवाय शेततळे, नाला बांधकाम, भातखाचर इत्यादी कामे सुद्धा करण्यात येतील. त्याच बरोबर गाव शिवारात पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी ज्या पद्धतीने कामे करता येऊ शकतील ती कामे करण्याचा प्रयत्न राहील. या सात गावांची निवड यंदा ज्या सात गावांची निवड जलयुक्त शिवार योजनेत करण्यातआली त्यात नवाटोला, जांभळी, महाराजीटोला, खडखडीटोला, रामाटोला, पिपरीया आणि निंबा या गावांचा समावेश आहे. यातील नवाटोला, जांभळी, महाराजीटोला आणि खडखडीटोला आणि निंबा ही पाच गावे एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन समिती अंतर्गत होणार असून रामाटोला आणि पिपरीया या दोन गावाची कामे कोरडवाहू कार्यक्रमांतर्गत करण्यात येईल. स्थानिक आमदार संजय पुराम यांच्या शिफारशीनुसार वरील सात गावांना जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करुन काम करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अभियंता, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता (जि.प.) तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी यांची सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.