शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी गोंदियात ‘सारस स्केप’ ची ७८ गावांत लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 10:38 IST

निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरूणांनी घेतली आहे.

ठळक मुद्दे१३ वर्षापासून स्वयंसेवकांची धडपडसारस पक्ष्यांच्या संख्येत होत आहे वाढ

नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरूणांनी घेतली आहे. गोंदिया, बालाघाट व भंडारा या तीन जिल्ह्यांतील ‘सारस स्केप’ मधील ७८ गावात सारस बचावासाठी या तरूणांनी सेवा संस्था निर्माण केली. या संस्थेच्या माध्यामतून सदस्यांनी गावागावातील नागरिकांना सारस संवर्धनासाठी लोकचळवळ उभी केली आहे.महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. १३ वर्षापूर्वी अत्यल्प असलेली सारसांची संख्या आता ३५ च्या घरात पोहचली आहे. गोंदिया, भंडारा व मध्यप्रदेशच्या बालाघाट या तिन जिल्ह्यात सारस संवर्धनाचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे गोंदिया, बालाघाट व भंडारा या तिन्ही जिल्ह्यातील सारस स्केप मधील संख्या आजघडीला ८० ते ८५ च्या दरम्यान आहे. या तिन जिल्ह्यात सारसांचे अधिवास असल्याने या गावांमधील लोकांना सारसाचे महत्व पटवून देण्याबरोबर त्यांचे संवर्धन कसे करावे हे सांगण्यासाठी सेवा संस्थेचे तरूण गावागावात वेळोवेळी पोहचत आहेत. मागील ५ वर्षापासून सेवा संस्थेच्या अविरत कार्यामुळे गावागावात सारस संवर्धनासाठी आता लोकांनी पुढाकार घेतला आहे. गोंदियाचे वैभव असलेल्या सारसांची संख्या वाढविणे किती महत्वाचे आहे ही बाब ओळखून आता सारस बचावासाठी लोकचळवळ उभी झाली आहे. प्रत्येक गावातील तरूण किंवा त्या गावातील पुढारी सारसच्या संवर्धनासाठी आपले योगदान देत आहे. ज्या शेतात सारसांची घरटी आहेत त्या घरटींवर संनियंत्रण या तरूणांबरोबर पक्षीप्रेमींची असते. याचेच फलीत सारसांचे नविन बच्चे तयार होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४० गावात, बालाघाट जिल्ह्यातील ३५ तर भंडारा जिल्ह्यातील ३ गावात हे तरूण सारस संवर्धनासाठी घराघरात पोहचले आहेत.सारस संरक्षणासाठी ठोस उपाय नाहीसारस बचावासाठी सेवा संस्थेंकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांच्या कार्याला शासनाच्या कार्याची जोड मिळाल्यास सारस संवर्धन करण्यास जोमाने मदत होईल. ज्या सारसाने गोंदियाचे नाव देशाच्या पाठीवर नेऊन ठेवले त्या गोंदियाच्या वैभवाकडे शासन व प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष होत आहे. सारस संवर्धनासाठी पाहिजे त्या प्रमाणात अजूनही ठोस पावले उचलण्यात आली नाही. सारस संवर्धन प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. संस्थेने अनेक प्रस्ताव शासन दरबारी मांडले आहेत. आताचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सारस हे गोंदियाचे वैभव आहे असे ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी ते गांभीर्याने लक्ष घालत आहेत.प्रेमासाठी त्यागाचे प्रतिकभारतात सारस पक्ष्याचे जोडपे पाहून नवीन लग्न झालेले जोडपे आपल्या सुखी जीवनाची सुरूवात करतात. जून महिन्यात सारसची जोडी एकत्र येते. जोडीने नृत्य करणे, उड्या घेणे व गवताच्या काड्या ऐकमेकावर फेकने, नर जातीचे सारस चोच वर करून पंख पसरविते तर मादा जातीचे सारस मान खाली करून प्रतिसाद देते. सारस प्रेमात त्याग ही करते. सारस पक्ष्याचे एकमेकावरील प्रेम त्यागाचे प्रतिक आहे. जोडीतील एक सारस मेल्यावर दुसराही सारस त्यागच्या भावनेतून आपले प्राण त्यागतो, असे आपल्या पुर्वजांचे म्हणणे होते.जेव्हा सारस बचाव अभियानाची सुरूवात झाली. तेव्हा गावागावात किंवा शासन स्तरावर जनजागृती नव्हती. सारसांचे महत्व त्यावेळी कळत नव्हते आता ते कळू लागले आहे. शासनही याकडे लक्ष देत आहे.आम्हचे स्वयंसेवक न थकता मागील अनेक वर्षांपासून नियमीत कार्य करीत आहेत. हे कार्य पुढे सुरूच राहील.-सावन बहेकारमहाराष्ट युथ आयकॉन २०१४ तथासँक्चुरी एशिया अवॉर्ड २०१६ पुरस्कार विजेते.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य