शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

७७६ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:07 IST

तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : जलयुक्त शिवार अभियानाकरिता २.९६ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.धापेवाडा उपसा सिंचन योजना, लघू पाटबंधारे तलाव, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती व नाला सिमेंटीकरणाकरिता १६ गावांसाठी २ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून यामुळे ७७६ हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने केसलवाडा येथील साठवण बंधारा दुरुस्तीकरिता १८.४९ लाख, खेडेपार येथील बंधारा दुरुस्तीकरिता ३.२० लाख, कुल्पा बंधारा दुरुस्ती ५.९९ लाख, लेदडा बंधारा दुरुस्ती ३.१९ लाख, मनोरा बंधारा दुरुस्ती ५.४७ लाख, मुरपार बंधारा दुरुस्ती ६.४७ लाख, सिल्ली लपा तलाव दुरुस्ती १५.२५ लाख, सोनेखारी बंधारा दुरुस्ती ९.१८ लाख, मुंडीकोटा कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती ५.६१ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती १३.५९ लाख, लपा तलाव दुरुस्ती १५.२७ लाख, सिमेंटनाला बांधकाम ६.२८ लाख, खुरखुडी कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती ४.९९ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती २.६८ लाख, बोदा लपा तलाव दुरुस्ती ५५.४१ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती ६.७६ लाख, बिहरिया येथील साठवण बंधारा दुरुस्तीकरिता १०.८९ लाख, मामा तलाव दुरुस्ती ६.५० लाख, किंडगीपार साठवण बंधारा दुरुस्ती १८.०३ लाख, सिमेंटनाला बांधकाम ९.७१ लाख, भुराटोला साठवण बंधारा दुरुस्ती ३.२५ लाख, डोंगरगाव (ख.) साठवण बंधारा दुरुस्ती २.९० लाख, शासनातर्फे मंज़ूर करण्यात आला असून यामुळे ७७६.२७ हेक्टर जमिन सिंचनाखाली येवून १२१७.५० दलघमी जलसाठा निर्माण होणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार