शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

७६० विद्यार्थिनी सायकलला मुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:21 IST

अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता.

ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रमाबाबत उदासीनता : प्रत्येक तालुक्यातून ९५ लाभार्थ्यांची घट

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु यंदा फक्त ५७१ विद्यार्थिनींनाच सायकली देण्याची तरतूद आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यातील ९५ म्हणजेच जिल्ह्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकल पासून वंचित ठेवण्यात आले.शाळेत जाण्यासाठी ८ ते १२ वी च्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये टाकण्याची योजना शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत अमंलात आणली. शून्य ते पाच किमी अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकलींचा लाभ देणे आवश्यक होते. परंतु आता प्रत्येक तालुक्याला फक्त ५७१ सायकल देण्याचे ढिसाळ नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो गरीब विद्यार्थिनी सायकलींपासून वंचीत राहात आहेत.गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके असल्याने पाच हजार ३२८ विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देणे अपेक्षित होते. परंतु यंदा प्रत्येकच तालुक्यातील ९५ लाभार्थ्यांना लाभ देता येणार नाही असे ढिसाळ नियोजन करण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थिनी सायकलपासून वंचीत आहेत.जिल्ह्यात हजारो मुली या योजनेचा लाभ मागण्यासाठी हात पुढे करून आहेत. परंतु मानव विकास कार्यक्रम राबविणाºया अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थिनी वंचित राहात आहेत.सन २०१३-१४ पासून या योजनेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे पाच हजार ३२८ मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु त्यानंतर कमी मुलींना लाभ देण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील ९५ विद्यार्थिनी अशाप्रकारे जिल्हाभरातील आठ तालुक्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकलपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.१० हजाराहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेतमानव विकास योजनेंतर्गत सायकल करीता आता तीन हजार ५०० रूपये देण्यात येत आहे. यासाठी गोरगरिबांच्या मुलींना या योजनेचा लाभ न देता आपल्या मर्जीतील लोकांच्या पाल्यांना सायकलचा लाभ देतात. उर्वरीत मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही. १० हजारांहून अधिक विद्यार्थिनींना सायकलची प्रतिक्षा आहे.सायकलचे आमिष देत घेतात अ‍ॅडमिशनविद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तुकडी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी फिरू लागले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींना अ‍ॅडमिशन घ्या सायकल देऊ असे आमिष दिले जात आहे. त्या आमिषाची काही ठिकाणी पुर्तता केली जाते, तर काही ठिकाणी पूर्तता केली जात नाही. मुलींना सायकलचे दिलेले आमिष पूर्ण करण्यासाठी मानव विकासच्या सायकलींचा आधार घेतला जात आहे.सायकलची किंमत वाढल्याने ५०० रूपयांनी लाभात वाढसायकलचा लाभ देण्यासाठी मुलींना तीन हजार ५०० रूपये त्यांच्या खात्यात टाकले जाते. जिल्हा नियोजन अधिकारी हा निधी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे देतात, शिक्षणाधिकारी हा निधी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतात व ते विद्यार्थिनींच्या खात्यात सुरूवातीला दोन हजार रूपये व मुलीने सायकल घेतल्यानंतर बील सादर केल्यास उर्वरित दीड हजार रूपये त्यांना दिले जाते. पूर्वी तीन हजार रूपये दिले जात होते. आता सायकलच्या किंमती वाढल्यामुळे तीन हजार ५०० रूपये लाभ देण्यात येतो.एक कोटी ६० लाखांचेच नियोजनसायकलच्या किमती वाढल्या त्यामुळे लाभार्थ्यांंना ५०० रूपये अधिक देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला एक कोटी ६० लाख रूपये दिले जातात. पूर्वीचीच रक्कम जिल्ह्याला मिळत असते. आणि सायकलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कमी लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र