शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

७६ हजार जिल्हावासी निराधाराच

By admin | Updated: August 15, 2016 00:08 IST

शासनाने प्रत्येकाला आधारकार्ड नोंदणी बंधनकारक केली असतानाही जिल्ह्यातील ७६ हजार ३४४ नागरिक अद्याप निराधारच दिसून येत आहेत.

९४ टक्के उद्दीष्ट पूर्ती : आधार नोंदणीची मोहिम थंडावली कपिल केकत  गोंदिया शासनाने प्रत्येकाला आधारकार्ड नोंदणी बंधनकारक केली असतानाही जिल्ह्यातील ७६ हजार ३४४ नागरिक अद्याप निराधारच दिसून येत आहेत. सन २०१५ च्या लोकसंख्येनुसार याची टक्केवारी ९४.५४ एवढी आहे. त्यामुळे आधारकार्ड नोंदणीसाठी पुन्हा एकदा मोहिम राबविण्याची गरज दिसून येत आहे. आज प्रत्येकच कामासाठी शासनाने आधारकार्ड आवश्यक केले आहे. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत यात ग्रामीण असो वा शहरी प्रत्येकालाच आधारकार्ड नोंदणी करणे बंधनकारक व तेवढेच आवश्यक झाले आहे. आजच्या स्थितीत बँक खाते असो वा शाळेतील प्रवेश प्रत्येकच कामासाठी पालक व पाल्य दोघांच्या आधारकार्डची हमखास गरज भासत आहे. एवढेच नव्हे तर शासकीय अनुदान व अन्य लाभांसाठीही आधारकार्ड क्रमांक मागीतला जातो. यावरून आजच्या स्थितीत आधारकार्ड किती महत्वाची वस्तू बनली आहे याची प्रचिती येते. कोणतेही काम असल्यास आधारकार्ड लागणारच अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या आधाराकार्डसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणात शिबिर घेऊन आधारकार्ड नोंदणी करण्यात आली. याचे फलीत असे आहे की, सन २०१५ च्या लोकसंख्येनुसार १३ लाख ९९ हजार १४ नागरिकांतील १ लाख २२ हजार ६७० नागरिक आज आधारकार्ड धारक आहेत. मात्र यातील उरलेले ७६ हजार ३४४ नागरिक अद्याप निराधार म्हणजेच ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही असे आहेत. टक्केवारी नुसार जिल्ह्यातील ९४.५४ टक्के नागरिकांनी आपली आधार नोंदणी केलेली नाही. परिणामी जिल्हा अद्यापही पूर्णपणे आधारकार्ड नोंदणीकृत झालेला नाही. यासाठी आधार नोंदणीसाठी पूर्वी राबविण्यात आलेली मोहिम थंडावल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांनाही त्याचा विसर पडला असून हे काम रेंगाळत चालले आहे. करिता पुन्हा आधारकार्ड नोंदणीसाठी मोहिमेची गरज आहे. आधार नोंदणी मोहिमेची गरज सुरूवातीला आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाकडून मोहिम राबविण्यात आली. परिणामी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेत आपली आधारकार्ड नोंदणी करवून घेतली. मात्र आज ही मोहिम थंडावली आहे. कित्येकांना आता नोंदणी कुठे सुरू आहे हेच माहिती नसल्याने त्यांनीही दुर्लक्ष केले आहे.सध्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे २३ मशिन्स दिल्याची माहिती आहे. मात्र नोंदणीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे ही मोहिम पु्न्हा एकदा राबविल्यास नक्कीच त्याचा फायदा मिळणार. २०११ च्या लोकसंख्येची उद्दीष्टपूर्ती प्राप्त आकडेवारीनुसार सन २०११ ची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढ नोंद असून तेवढी आधार नोंदणी झाल्याचे कळते. म्हणजेच सन २००११ च्या लोकसंख्येची उद्द्ीष्टपूर्ती झाली आहे. मात्र सन २०१५ ची लोकसंख्या वाढून १३ लाख ९९ हजार ०१४ एवढी असून त्यातील ७६ हजार ३४४ नागरिक आधार नोंदणीपासून वंचीत आहेत. परिणामी सन २०१५ च्या लोकसंख्येची उद्दीष्टपूर्ती झालेली नाही.

अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुका अग्रेसर आधार नोंदणीच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुका अग्रेसर असून त्यांनी १०० टक्के नोंदणी केली आहे. तर गोंदिया तालुक्यात ७३.३१ टक्के, गोरेगाव तालुक्यात ९०.४४ टक्के, तिरोडा तालुक्यात ९१.२५ टक्के, देवरी तालुक्यात ९५.७४ टक्के, सालेकसा तालुक्यात ८८.४७ टक्के व सडक-अर्जुनी तालुक्यात ८०.०४ टक्के नोंदणी झाल्याची माहिती आहे.