शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७५ हजार कुटुंब झाली धूरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:36 IST

धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे.

ठळक मुद्दे८२ टक्के नियमित वापर : पहिले सहा महिने अनुदान कपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाले आहे.प्रत्येक कुटुंबाचे स्वयंपाक घर धूर मुक्त व्हावे, गरीब महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपुर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदीकाठालगतचे कुटुंब यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या निर्माण होते. तसेच यासाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषणात सुध्दा वाढ होत होती. स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाली होती. हे टाळण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत तिन्ही मुख्य गॅस वितरण कंपन्याकडून गोंदिया जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांची टक्केवारी ८९.५ टक्के झाली आहे.या योजनेमुळे ३४.४ टक्के गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी ८२ टक्के कुटुंब नियिमित गॅस सिलिंडर भरुन त्याचा वापर करीत असल्याचा दावा हिंदुस्थान पेट्रोलियमचे जिल्हा नोडल अधिकारी आदित्य टांक यांनी केला. लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत अनुदानावर गॅस कनेक्शन दिले जात आहे. गॅस कनेक्शनची रक्कम सिलिंडरवर दिल्या जाणाºया अनुदानात कपात केली जात होती. मात्र यामुळे गॅस सिलिंडरची उचल करणाºया ग्राहकांची संख्या कमी झाली होती.त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश साध्य होत नव्हता. यासाठी शासनाने लाभार्थ्याना गॅस कनेक्शन दिल्यानंतर सुरूवातीचे सहा महिने कनेक्शनची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गॅस सिलिंडरची नियमित उचल करुन वापर करणाºयांची संख्या वाढली असून जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाल्याचे चित्र आहे.राज्यात पाच कोटी गॅस कनेक्शन वाटपाचे उद्दिष्टउज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यात मार्च २०१९ पर्यंत दारिद्र्यरेषेखालील ५ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. राज्यात १८ डिसेंबरपर्यंत १ कोटी ५६ लाख लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.धूरमुक्त जिल्हा आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी उज्ज्वला योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.- आदित्य टांक, जिल्हा नोडल अधिकारी हिदुस्थान पेट्रोलियम.