शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के मतदान

By admin | Updated: July 1, 2015 02:06 IST

जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) जिल्ह्यातील ११०५ केंद्रांवर मतदान झाले.

नावे वगळली : अनेक जण अधिकारापासून वंचितगोंदिया : जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) जिल्ह्यातील ११०५ केंद्रांवर मतदान झाले. रात्री ९ पर्यंत प्राप्त टक्केवारीनुसार सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकारामुळे त्यांना वंचित राहावे लागले. हा प्रकार सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले.जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अशा संवेदनशिल मतदान केंद्रांवरही कोणता अनुचित प्रकार घडला नाही.जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात २३७ आणि तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ असे एकूण ६६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामीण राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. युवा मतदारांपेक्षाही वयोवृद्ध नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडीवर होते. विशेष नक्षलग्रस्त भागातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही प्रमाणीला प्राधान्य दिले.बाराभाटी परिसरात नागरिक शेती कामामध्ये जास्त गुंतून असल्याने दुपारी ३ पर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. या परिसरात संपूर्ण टक्केवारी काढली असता ७० टक्केपेक्षा कमीच झाल्याचे सांगण्यात आले. नवीन मतदार आणि तरुण मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. नक्षलग्रस्त संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त चोख होता.देवीर, सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यांसह आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. त्यामुळे तेथील मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत गर्दी होती. बाकी केंद्रांवर सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान असल्याने संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास पुन्हा गर्दी उसळली.मतमोजणी ६ जुलैलाया निवडणुकीच्या निकालासाठी ६ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी आणखी ५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.