शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाने ७३ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: May 18, 2015 00:47 IST

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूची आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे.

नरेश रहिले गोंदियाआदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूची आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. याबाबीत आरोग्य विभागाकडून वर्षभरात आठच बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ६५ बालक तर अतितीव्र्र कमी वजनाची आठ अशी एकूण ७३ बालके वर्षभरात दगावली आहेत. यातून जिल्ह्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च १०१५ या काळात गोंदिया जिल्ह्यात १८ हजार ६६८ बालके जन्मली. त्यात ग्रामीण भागात १२ हजार ४४४ बालके तर शहरी भागात ६ हजार २२४ बालके जन्मली आहेत. यात ग्रामीण भागातील २११ तर शहरी भागातील २७६ बालकांचा अशा एकूण ४८७ बालकांचा वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. याशिवाय सामान्य श्रेणीतील ९५ बालके, कमी वजनाची ४३ बालके, तर कुपोषणाच्या श्रेणीतील तीव्र्र कमी वजनाची ६५ बालके तर अतितीव्र कमी वजनाची आठ बालके दगावली आहेत. अशाप्रकारे तीव्र व अतितीव्र्र कमी वजनाची ७३ बालके दगावली आहे. कुपोषण मुक्तीसाठी शासन मोठे प्रयत्न करीत असले तरीही गोंदिया जिल्ह्यात कुपोषण थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. परंतु तीव्र्र कमी वजनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग कुपोषणाने मृत्यू मानत नाही. अती तीव्र कमी वजनाच्या बालकांनाच कुपोषित समजून त्यांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे मानते. ज्यांचे वजन तीव्र कमी आहे ते कुपोषित नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाने फक्त आठ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभाग देतो. गोंदिया जिल्ह्यात तीव्र व अतितीव्र्र वजनाने ७३ बालकांचा मृत्यू झाला असला तरी महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.अंगणवाडीच्या तीन श्रेणीआंगणवाडी कडून बालकांची पाहणी करताना तीन श्रेणीत त्यांच्याकडून पाहणी होते. पहिली श्रेणी सर्वसाधारण, दुसरी श्रेणी कमी वजन व तिसरी श्रेणी तीव्र कमी वजन असते. कमी वजन व तीव्र कमी वजनाची बालके कुपोषणाच्या वाटेवर असतात. परंतु वेळेत त्यांना संकरीत आहार मिळाला तर त्यांच्यात बदल होऊन ते सामान्य श्रेणीत येतात. तीव्र कमी वजनाच्या बालकांना कुपोषित समजण्यात येते. जिल्ह्यात या श्रेणीतील ७३ बालके मृत्युमुखी पडली आहेत. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षगोंदिया जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. ग्रामीण भागातील महिला गर्भवती असतानाही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. गर्भावस्थेतही त्यांना संकरीत आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटात असलेले बाळ कुपोषित म्हणून जन्माला येते. हेच कारण आहे की गर्भवती मातांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांच्या बाळांच्या माध्यमातून पुढे येते. कुपोषण हे त्याचेच परिणाम आहे.